‘चाणक्य’ सांगतात या गोष्टी कधीच कोणालाही सांगू नयेत, अन्यथा…

‘चाणक्य’ सांगतात या गोष्टी कधीच कोणालाही सांगू नयेत, अन्यथा…

अर्थनाशं मनस्तापं गृहिणीचरितानि च।

नीचवाक्यं चाऽपमानं मतिमान्न प्रकाशयेत्।।

आचार्य चाणक्य सांगतात, जगात आजवर असा एकही व्यक्ती झाला नाही की ज्याला कधीही धनहानीचा सामना करावा लागला नसणार. जर तुमचे व्यवसायात भले मोठे नुकसान झाले असेल तर त्याची जास्त चर्चा करू नका. कारण ही गोष्ट सर्वांना समजल्यास आर्थिक कामामध्ये आपल्याला कोणीही मदत करणार नाही. पैशांची मदत अशाच लोकांना केली जाते, जे पहिल्यापासूनच सक्षम असतात. म्हणून या गोष्टीची चर्चा करुन टाळा.

नवरा बायको म्हटलं की वाद हे होतातच, असे एकही घर शोधून सापडणार नाही की ज्या घरामध्ये नवरा बायकोचे भांडण होत नसेल. प्रत्येक घरात कधी न कधी पती-पत्नीमध्ये वाद होत असतात, अशा वाद-विवादांची चर्चा घराबाहेर इतरांसमोर करू नका.

पुरुषाने आपल्या पत्नीच्या स्वभावाशी संबंधित गोष्टी गुपित ठेवाव्यात. पत्नीशी संबंधित कोणतीही चर्चा इतर लोकांसमोर केल्यास भविष्यात भयंकर अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता वाढते.

आपण आपल्या मनाचा संताप म्हणजे दुःख कोणासमोरही उघड करू नये. अशा गोष्टीमुळे कोणताही लाभ तर होतच नाही उलट समाजात आपण हास्याचा विषय अवश्य बनतो. असे अनेक लोक आहेत, ज्यांना इतरांचे दुःख पाहून सुख मिळते, म्हणजे लोक फक्त ऐकून घेतात आणि नंतर त्याचा ते फायदा घेतात.

आचार्य सांगतात की, जर तुमच्या जीवनात एखाद्या नीच व्यक्तीमुळे तुम्हाला अपमानित व्हावे लागले असेल तर ती घटना गुपितच ठेवावी. अपमानाशी संबधित घटना समाजात सांगितल्यास आपण हास्याचा विषय बनतो.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *