शुटिंग दरम्यानच ‘या’ 10 हिरोईन राहिल्या होत्या प्रेग्नंट, एकीचे तर लग्नही झाले नव्हते, नाव वाचून हैराण व्हाल…

करिना कपूर आजकाल गर्भवती आहे आणि पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ती आपल्या दुसर्या मुलाला जन्म देईल. मात्र, तीच्याच्या गरोदरपणामुळे ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटाचे निर्माते चिंतेत आहेत. वास्तविक या चित्रपटामध्ये करीना मुख्य भूमिकेत आहे आणि तिच्या बऱ्याच भागाचे चित्रीकरण अद्याप बाकी आहे, पण अभिनेत्रीच्या बेबी बंपमुळे निर्मात्यांना आता चित्रपटाच्या शूटिंगमध्ये अडचणी येऊ शकतात.
असेही म्हटले जात आहे की बेबी बंप लपविण्यासाठी, निर्माते आता संगणक ग्राफिक्सचा सहारा घेऊ शकतात. ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटाचे निर्माता आमिर खान आणि किरण राव आहेत, तर दिग्दर्शक अद्वैत चंदन आहेत. चित्रपटाचे बजेट सुमारे 200 कोटी आहे. या चित्रपटात आमिर खान, करीना कपूर व्यतिरिक्त विजय सेठूपती, मोना सिंग, मानव गोहिल, विवेक मुशरण आणि विनिता ठाकूर यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
2) काजोल : २०१० मध्ये ‘वी आर फॅमिली’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान काजोल प्रेग्नंट झाली होती. या चित्रपटात काजोलने तीन मुलांच्या आईची भूमिका केली होती. प्रेग्नंट असूनही, काजोलने केवळ चित्रपटाचे शूटींगच पूर्ण केले नाही तर तिने एका प्रमोशनल कार्यक्रमातही भाग घेतला होता. अजय देवगणला काजोलने विश्रांती घ्यायचां सल्ला देऊन तशी इच्छा व्यक्त केली होती, परंतु प्रसूतीच्या काही महिन्यांपूर्वीपर्यंत काजोल काम करत राहिली. चित्रपटानंतर काजोलने मुलगा युगला जन्म दिला.
3) ऐश्वर्या राय : ‘हिरोईन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या राय प्रेग्नंट झाली, ज्यामुळे तिने या चित्रपटाचे शूटिंग बंद केले होते. या चित्रपटाचे काही सीन ऐश्वर्याबरोबर शुट झाले होते. ऐश्वर्याने मध्यंतरी हा चित्रपट सोडला आणि त्यावेळी खूप त्रास सहन करावा लागला होता. या चित्रपटात ऐश्वर्याऐवजी करीना कपूरला घेण्यात आले होते.
4) जूही चावला : 1995 मध्येच जूहीने बिझनेसमन जय मेहताशी लग्न केले होते. यानंतरही तीने चित्रपट सोडले नाहीत. जेव्हा जूही पहिल्यांदा प्रेग्नंट होती, तेव्हा तिला अमेरिकेतून स्टेज शोची ऑफर मिळाली होती ज्या ऑफरला जूहीने नकार दिला नव्हता आणि दुसऱ्यांदा ‘झंकार बीट्स’ चित्रपटाच्या वेळी देखील जुही प्रेग्नंट झाली.
5) माधुरी दीक्षित : माधुरी दीक्षित देखील अशाच अभिनेत्रींपैकी एक आहे जिने कोणत्याही परिस्थितीत तिच्या कामाशी तडजोड केली नाही. वास्तविक, ‘देवदास’ चित्रपटाच्या वेळी माधुरी प्रेग्नंट होती आणि तिने ‘हमपे ये किसने हरा रंग डाला’ चित्रपटाच्या एका गाण्यात एक उत्तम नृत्य केले होते.
6) श्रीदेवी : ‘जुदाई’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान श्रीदेवी प्रेग्नंट होती. त्यावेळी ती आपली मोठी मुलगी जाह्नवी कपूर हिला जन्म देणार होती. या चित्रपटाचे निर्माता बोनी कपूर होते. असे म्हटले जाते की श्रीदेवी जेव्हा प्रेग्नंट होती, त्यावेळी तिचे लग्नही झाले नव्हते. लग्न होण्यापूर्वीच ही अभिनेत्री प्रेग्नंट झाली होती. नंतर श्रीदेवी आणि बोनीचे लग्न झाले.
7) फराह खान : ‘ओम शांती ओम’ चित्रपटाचे दिग्दर्शन करत असताना फराह खान प्रेग्नंट होती. असे असूनही, तीने चालू काम थांबवले नव्हते. ती प्रेग्नंट असतानाही ती काम करत राहिली. नंतर फराहने एकत्र तीन मुलांना जन्म दिला, त्यातील एक मुलगा आणि दोन मुली आहेत.
8) मौसमी चटर्जी : “रोटी कपडा और मकान” या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मौसमी चटर्जी प्रेग्नंट होती. मनोज कुमारची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात मौसमीबरोबर बला-त्काराचा सीन चित्रित करण्यात येणार होता. कारण त्यावेळी मौसमी प्रेग्नंट होती व तब्येतही ठीक नव्हती. त्यामुळे या बलात्काराच्या सीनची शूटिंग कशी करणार याची चिंता मौसमीला होती. मात्र, नंतर या देखाव्याचे चित्रीकरण करण्यात आले.
9) जया बच्चन : जया आणि अमिताभने शोले चित्रपटापूर्वीच लग्न केले होते. आणि चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जया गर्भवती होती. तरी देखील जयाने त्यावेळी आराम केला नाही. चित्रपटाचे शूटिंग करतच राहिली होती. या चित्रपटाच्या एका सीन मध्ये जया बच्चनचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. नंतर जयाने मुलगी श्वेताला जन्म दिला.
10) नंदिता दास: अभिनेत्री आणि दिग्दर्शक नंदिता दास ‘आईं एम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गर्भवती होती. तथापि, अशा वेळी तीने घरी विश्रांती घेण्याऐवजी शूटिंगला जाणे पसंत केले होते. या चित्रपटात नंदिताने एका मुलीची भूमिका केली होती जी घरी एकटीच रहात होती पण तिला आई बनण्याची इच्छा होती.
11) कोंकणा सेन: कोंकणा सेनने गरोदरपणाचे काळातच मिर्च व्यतिरिक्त राईट या रांग या चित्रपटासाठी शूट केले होते. गरोदर असून देखील तीने तीचे काम थांबवले नव्हते. एवढेच नाही तर तिने प्रेग्नन्सी दरम्यान फोटोशूटही केले. चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही तिचा सहभाग होता.