सीआयडीच्या एका एपिसोडसाठी शिवाजी साटम घ्याचे इतकं मानधन..

ज्या टीव्हीला आधी छोटा पडदा म्हणायचे ते दिवस आता गेले आहेत. कारण आता हाच छोटा पडदा आता बॉलिवूडलाही टक्कर देत आहे. मोठं मोठे कलाकार टेलिव्हिजन वर काम करण्यासाठी स्वतःहून पूढे येत आहेत. कारण टीव्ही कलाकार आता बॉलिवूडकरांपेक्षा जास्त मानधन घेत आहेत.
मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची काम करण्याची पद्धतही वेगळी असते. त्यांनी त्यांचं काम शिफ्ट मध्ये करावं लागतं. एकच व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्यांना अनेक वर्षे मेहनत घ्यावी लागते. टीव्हीवरील असाच एक लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेते शिवाजी साटम यांचा.
पण तुम्हाला हे माहिती आहे का, की ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी शिवाजी साटम किती मानधन घ्यायचे? ‘जनसत्ता डॉट कॉम’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, शिवाजी साटम एका एपिसोडसाठी साधारणपणे १ लाख रुपये घ्यायचे. ते या कार्यक्रमासाठी महिन्यातले १५ दिवस काम करत तर उर्वरीत दिवसांत ते सिनेमांचे चित्रीकरण करत असत.
शिवाजी साटम यांच्या करिअरची सुरूवात टेलिव्हिजनपासूनच झाली होती. यानंतर त्यांना अनेक सिनेमांच्या ऑफर्स येऊ लागल्या. आतापर्यंत त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.