सिनेमाच्या बदल्यात निर्माता म्हणाला – ‘एक रात्र’ ‘या’ मराठी अभिनेत्रीने केला ‘खळबळजनक’ खुलासा !

अभिनेत्री श्रुती मराठे हे नाव आणि चेहरा मराठी फिल्म इंडस्ट्रीत फेमस आहे. श्रुतीनं तिचा कास्टींग काऊचबद्दलचा अनुभव सांगितला आहे. याबद्दल तिनं एक लांबलचक पोस्ट लिहली आहे. तिनं कास्टींग काऊचला कशा प्रकारे थेट सवाल केला हेही तिनं सागितलं आहे.
श्रुती म्हणाली, ‘एका निर्मात्यानं मला लिड रोलची ऑफर दिली. आधी तर तो प्रोफेनशल बोलत होता. नंतर मात्र त्यानं समझौता आणि वन नाईट स्टँड असे शब्द वापरले. शरीरसुखाची मागणी करत तो म्हणाला, अॅक्ट्रेस होण्यासाठी तडजोडी कराव्या लागतात.
पुढे श्रुती म्हणते, ‘मी या घटनेबद्दल इतरांना सांगितलं असता त्यांनी माला प्रोजेक्ट सोडायला सांगितला. मी लगेच तो प्रोजेक्ट सोडून दिला. मला निर्भिड व्हायला फक्त 1 मिनिट लागला. मी फक्त माझ्यासाठी उभी नाही राहिले तर त्या महिलांसाठीही उभी राहिले. ज्यांना सहज जज केलं जातं.’
श्रुतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सनई चौघडे या सिनेमातून तिने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. हा मराठी सिनेमा यशस्वी ठरला. या सिनेमानंतर श्रुती मराठी लोकांमध्ये खूपच लोकप्रिय झाली.
सिनेमांव्यतिरीक्त श्रुतीनं अनेक मराठी मालिकेतही काम केलं आहे. तिनं आजपर्यंत 20 हून अधिक सिनेमे केले आहेत. श्रुतीनं हिंदीसोबतच तमिळ, कन्नड सिनेमातही काम केलं आहे. पंरतु मालिकेत श्रुती खूपच यशस्वी ठरली.