‘दारूमुळे’ कोरोना व्हायरसपासून बचाव होऊ शकतो का? जाणून घ्या सत्य..

‘दारूमुळे’ कोरोना व्हायरसपासून बचाव होऊ शकतो का? जाणून घ्या सत्य..

चीनमधून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसच्या विळाख्यात संपुर्ण जग अडकले आहे. भारतात देखील 80 पेक्षा अधिक जणांना याची लागण झाली आहे. या व्हायरसपासून बचावासाठी अनेक उपाय सुचवले जात आहेत. दरम्यान डब्ल्यूएचओने कोरोना व्हायरसला जागतिक महामारी म्हणून घोषित केले आहे. शासनाकडून अनेक उपक्रम राबविले जात असताना सोशल मीडियावर अफवांचा पाऊस पडताना दिसत आहे.

सद्या सोशल मीडियावर अशी एक अफवा पसरत आहे की, दारू पिल्याने कोरोना व्हायरसपासून बचाव होतो. म्हणून याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) खुलासा केला आहे. चला जाणून घेऊया.

डब्ल्यूएचओने ही माहिती चुकीचे असल्याचे सांगितले आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस एडेनॉम घेब्रीसस यांनी सांगितले की, दारूच्या सेवनामुळे कोरोना व्हायरसपासून बचाव होतो, ही माहिती खोटी आहे.

डब्ल्यूएचओनुसार, शरीरात व्हायरस गेल्यास क्लोरिन अथवा दारूमुळे कोणताही व्हायरस मरत माही. त्याचबरोबर कपडे, डोळे आणि चेहऱ्यांवर दारू शिंपडने आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

डब्ल्यूएचओकडून सांगण्यात आले आहे की, कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी अल्कोहल असलेल्या हँडवॉशने वारंवार हात धुवावेत. आणि शक्य होईल तेवढं आपले हात पाय स्वच्छ ठेवावे.

कोरोना व्हायरस इतर व्हायरसच्या तुलनेत अधिक घातक आहे, कारण कोरोनाचे विषाणू एखाद्या निर्जीव वस्तूला लागल्या नंतर अधिक काळ जिवंत राहू शकतात. या पासून बचावासाठी वारंवार हात दुवा. नोक,तोंड, आणि डोळ्याला जास्त हात लावू नको. वर्दळीच्या ठिकाणी वस्तूंना देखील हात लावू नका. व्हायरस पासून बचावासाठी शक्य होईल तेवढ प्रयत्न करा.

NEWS UPDATE

One thought on “‘दारूमुळे’ कोरोना व्हायरसपासून बचाव होऊ शकतो का? जाणून घ्या सत्य..

  1. Alkhol hand wash to daru ke ark se banta hai, aur o bahot mahenga deri kampani,
    Aur uska faida bhi to kampani ko hora, ustka products is karne bik raha hai.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *