दीपिका पदुकोणच्या बॉडीगार्डला आमदारापेक्षाही जास्त मिळतो पगार.. पाहून विश्वास बसणार नाही, दीपिका मानते त्याला आपला भाऊ..

दीपिका पदुकोणच्या बॉडीगार्डला आमदारापेक्षाही जास्त मिळतो पगार.. पाहून विश्वास बसणार नाही, दीपिका मानते त्याला आपला भाऊ..

बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षापासून सुरक्षारक्षक ही कन्सेप्ट चांगलीच रुजत आहे. जुन्या जमान्यात अनेक लोकप्रिय कलाकार देखील सुरक्षारक्षक वापरत असत. मात्र, जुन्याकाळी अभिनेते हे एवढी भीडभाड न ठेवता थेट आपल्या चाहत्यांना भेटत असत.

मात्र, सध्याचा चाहत्यांच्या ट्रेंड पाहता खेळाडू तसेच सेलिब्रेटी लोकांना बॉडीगार्ड ठेवणे आवश्यक झाले आहे. कारण चाहते हे कुठल्याही थराला जाऊन पोहोचतात. काही वर्षांपूर्वी मराठी चित्रपटसृष्टीत आलेल्या सैराट या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता.

सलमान याने बॉडीगार्ड चित्रपट याच शेराच्या थीम वरून बनवण्याची देखील त्यावेळी बॉलिवूडमध्ये चर्चा होती. सेलिब्रिटींचे बॉडीगार्ड म्हटले की, त्यांना आलिशान सुविधा मिळ तात. अमिताभ बच्चन यांना देखील अतिशय कडक असे सुरक्षा कवच आहे.

खाजगी सुरक्षा यंत्रणा त्यांना सुरक्षा पुरवते. त्यांच्या बॉडीगार्ड यांनाही कोट्यवधी रुपये पगार मोजण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. याचप्रमाणे राकेश रोशन यांना देखील खूप मोठी सुरक्षा असल्याचे सांगण्यात येते. काही वर्षांपूर्वी अंडरवर्ल्ड मधून यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. अनेकदा त्यांना धमक्या देखील मिळतात.

त्यामुळे त्यांनी सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे. शाहरुख खान यांच्या बाबतीतही काहीसे असेच आहे. त्याच्या आजूबाजूला देखील सुरक्षारक्षकांचा गराडा असतो. मात्र, त्यातूनही आमिर खान हा कमी प्रमाणात सुरक्षा वापरत असल्याचे दिसते.

कारण पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून त्याला देशात सर्वत्र फिरावे लागते. त्यामुळे तो लोकांमध्ये सहाजिकच मिसळतो आणि लोकही त्याला तेवढ्याच आपुलकीने विचारता त. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न त्याच्याबाबत फारसा येत नसल्याचे सांगण्यात येते. आम्ही आपल्याला आज दीपिका पादुकोण हिच्या बॉडीगार्ड बद्दल माहिती देणार आहोत.

दीपिका हिने काही वर्षांपूर्वी रणवीर सिंग याच्यासोबत लग्न केले आहे. त्यापूर्वी तिच्या लोकप्रियतेत काही कमी आली नव्हती. रणवीर सिंगपेक्षा दीपिका पदुकोण ही अधिक लोकप्रिय आहे. याचे कारण म्हणजे दीपिकाने आधी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर रणवीर सिंग याने काही वर्षानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

दीपिका पदुकोणची कमाई आणि लोकप्रियता जास्तच आहे. त्यामुळे तिला देखील बॉडीगार्डचा सहारा घ्यावा लागतो. दीपिका पदुकोण ही जलाल नामक बॉडीगार्ड आपल्यासोबत ठेवते. जलाल हा अतिशय धष्टपुष्ट आणि उचापुरा आहे. काही वर्षापूर्वी दीपिकाने लग्न केले.

त्यावेळी खास आमंत्रित यामध्ये जलाल याचे नाव देखील होते. तो हमेशा दीपिका पदुकोणच्या आजूबाजूला असतो. एका वृत्तानुसार दीपिका जलाल याला वर्षाकाठी 80 लाख रुपये मानधन देत असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणजेच साडेसहा लाख रुपये प्रति महिना त्याला आहे.

हे वतन एका आमदाराच्या वेतनापेक्षा अधिक आहे. तसेच दीपिका पादुकोण त्याला आपला भाऊ मानते. दरवर्षी रक्षाबंधनाला ती त्याला राखी बांधत असल्याचे सांगण्यात येते. याबाबतचा एक मजेदार व्हिडिओ दीपिका पदुकोन हिने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये दीपिका आणि जलाल मस्ती करताना दिसत आहेत.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.