धोनीच्या भूमिकेसाठी सुशांत सिंह राजपूत याने घेतली होती केवळ ‘एवढी’ रक्कम…

धोनीच्या भूमिकेसाठी सुशांत सिंह राजपूत याने घेतली होती केवळ ‘एवढी’ रक्कम…

सुशांत सिंह राजपूत याने अभिनयाने बॉलिवूडमध्ये ठसा उमटवला होता. त्याने रविवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुशांतने सिनेकरिअरमध्ये जास्त प्रमाणात सिनेमे साकारले नव्हते.

पण, तो एक यशस्वी अभिनेता म्हणून समोर आला होता. त्यानं टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोणी यांच्या कारकिर्दीवर एम.एस.धोनी द अनटोल्ड स्टोरी या सिनेमात माहीची मुख्य भूमिका साकारली होती.

त्याने त्याच्या अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याने त्याची बॉलिवूड करियरची सुरुवात ‘काय पो छे’ या चितपटातून केली होती. त्यांनंतर त्याला धोनीच्या जीवनावर आधारित असलेला ‘एमएस धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट मिळाला.

आणि हा चित्रपट चांगला गाजला होता. या चित्रपटानंतर त्याच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली. या चित्रपटानंतर त्याला काही मोठे चित्रपट मिळाले. यात केदारनाथ, छिछोरे असे काही चित्रपट आहेत.

‘एमएस धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ या भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या जीवनावर बनलेल्या चित्रपटात सुशांत धोनीच्या भूमिकेत दिसला होता. या भूमिकेसाठी त्याने 2 कोटी रुपये मानधन घेतले होते.

या चित्रपटासाठी सुशांतने खूप मेहनत घेतली होती. अगदी तो टीसीचे काम शिकण्यासाठी धोनी ज्या रेल्वे क्वार्टरमध्ये रहायचा तिथेही भेट देऊन आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 220 कोटींहून अधिक कमाई केली होती.

या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर सुशांतने त्याची भविष्यातील चित्रपटांसाठी फी देखील वाढवली होती. काही रिपोर्ट्सच्या नुसार त्याने या चित्रपटानंतर त्याच्या फीमध्ये दुप्पट वाढ केली होती. त्याची पुढील काही चित्रपटांसाठी ३.५ ते ४ कोटी रुपयांच्या फीची मागणी होती. याबद्दल त्यावेळी काही निर्मात्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *