क्रिकेटनंतर आता सिनेमात नशीब आजमवणार एम.एस.धोनी? ‘या’ चित्रपटातून लवकरच भेटणार तुम्हांला!

क्रिकेटनंतर आता सिनेमात नशीब आजमवणार एम.एस.धोनी? ‘या’ चित्रपटातून लवकरच भेटणार तुम्हांला!

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी क्रिकेट सोडल्यानंतर आता काय करणार याविषयी अनेकांना उत्सुकता आहे. क्रिकेटच्या करिअरनंतर आता तो इतर क्रिकेटरसारखं कॉमेंट्री करणार, प्रशिक्षक बनणार की दुसरं काही काम करणार? असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांच्या मनात आहेत.

मात्र सध्यातरी धोनी वेगळाच पर्याय निवडणार असं वाटतंय. सिनेइंडस्ट्रीत धोनीची अनेक मित्रमंडळी आहेत. धोनीच्या आयुष्यावर सिनेमा बनल्यानंतर त्याचे सिनेइंडस्ट्रीत चांगलेच मित्र बनले.

या सिनेमात संजय दत्त, सुनील शेट्टी आणि आर. माधवन काम करणार असल्याचं कळतंय. हा सिनेमाची कथा अंडर डॉग्सवर आधारित आहे. इतकंच नाही तर धोनी इतरही दुसरा सिनेमा साईन करु शकतो.

तसं पाहायला गेलं तर क्रिकेटर यांनी सिनेमात काम करणं तसं नवीन नाही. सुनील गावस्कर यांनी देखील प्रेमाची सावली या मराठी सिनेमात मुख्य भूमिका साकरली होती. त्यानंतर अनेक वर्षांनी मालामाल या सिनेमात कॅमिओ देखील केला होता.

यासोबतंच ८३ च्या वर्ल्डकपचा भाग असलेला हँडसम क्रिकेटर संदीप पाटील सिने इंडस्ट्रीतही लोकप्रिय होते. त्यावेळची चर्चित अभिनेत्री पूनम ढिल्लोसोबत त्यांचा ‘कभी अजनभी थे’ नावाचा सिनेमा देखील आला होता.

धोनी या सगळ्यांपेक्षा थोडा वेगळा आहे. धोनी क्रिकेटर आहे म्हणून नाही तर त्याच्यात असलेल्या अभिनयाच्या गुणांमुळे या क्षेत्रात यायचा विचार करतोय.

धोनीला पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरण्याची सवय असल्याने त्याला अभिनयाच्या बाबतीत देखील पडद्यावर लोकांनी क्रिकेटर म्हणून न ओळखता अभिनेता म्हणून ओळखावं असंच वाटतंय. धोनीला सतत व्यस्त राहायचं आहे म्हणून क्रिकेटनंतर त्याला त्याच्या दुस-या आवडीच्या कामात नशीब आजमवण्याची इच्छा असल्याचं कळतंय.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.