स्वतःच्याच चित्रपटातील अभिनेत्रीला पळून नेले होते ‘या दिग्दर्शकाने, विदेशात जाऊन केले फक्त हनिमून….!

स्वतःच्याच चित्रपटातील अभिनेत्रीला पळून नेले होते ‘या दिग्दर्शकाने, विदेशात जाऊन केले फक्त हनिमून….!

बॉलिवूड चित्रपटांमधील फेमस स्टार्स च्या अनेक प्रेमकथा तुम्ही आजपर्यंत ऐकल्या असतीलच. बॉलिवूड मूव्ही स्टार्सच्या लव्ह स्टोरीज बर्‍याच रंजक, रहस्यमय आणि मजेदार असतात. अभिनेता अभिनेत्री यांचे अनेक वेळा शूटिंग दरम्यानच एकमेकांवर प्रेम जडते. मग त्यानंतर ते एकमेकांना डेट वरही घेऊन जाऊन पुढे त्यांच्यात एक मोठी प्रेमकथा च सुरू होते.

अश्या पण काही प्रेमकथा आहेत ज्यामध्ये स्वतः दिग्दर्शकाचं त्याच्याच चित्रपटातील अभिनेत्रीवर प्रेम जडते. अश्या प्रकारच्या कहाण्या देखील जगप्रसिद्ध झालेल्या आपण बघत आलो आहोत. यापैकी सर्वच प्रेम कहाणी शेवटपर्यंत टिकेल याची देखील कुणाला शास्वती नसते. अशीच एका प्रेमाची कहाणी आपण आज येथे बघणार आहोत.

“ऐसा प्यार कहा” हा चित्रपट टूटू शर्मा यांनी निर्मित केला होता. ते स्वत: पद्मिनी कोल्हापुरे यांना चित्रपटाची कहाणी सांगायला गेले होते. या चित्रपटात पद्मिनी कोल्हापुरे जितेंद्रची बहीण होती. यावेळी शूटिंग दरम्यान दोघांनीही एकमेकांवर प्रेम करायला सुरुवात केले. चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी टूटू शर्मा हे पद्मिनी कोल्हापुरेला गुलाबाचे फुल पाठवत असत.

तथापि, हे संबंध पद्मिनी कोल्हापुरे यांच्या कुटुंबीयांनी स्वीकारले नाही. टूटू शर्मा आणि पद्मिनी कोल्हापुरे यांनी पळून जाऊन लग्न केले. लग्नानंतर ते दोघे जयपूरहून फ्लाईट ने मुंबईकडे जात असताना उड्डाणातील प्रवाश्यांनी टाळ्या वाजवून दोघांचे स्वागत केले. दोघे मुंबईत गेल्यानंतर तेथून ते दोघेही लंडनमध्ये गेले आणि तेथे हनिमून केले. टूटू शर्मा आणि पद्मिनी कोल्हापुरे हनीमूननंतर मुंबईत परतले तेव्हा जितेंद्रने दोघांच्या साठी त्याचे घरी पार्टी आयोजित केली होती.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *