..म्हणून अक्षय कुमारला “गे” समजत होती त्याची होणारी सासू, मुलीच्या लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ एक विचित्र अट…

..म्हणून अक्षय कुमारला “गे” समजत होती त्याची होणारी सासू, मुलीच्या लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ एक विचित्र अट…

आज ९ सप्टेंबर आज अक्षय कुमारचा वाढदिवस आज अक्षय कुमार 53 वर्षांचा झाला आहे. त्यांचा जन्म पंजाबच्या अमृतसरमध्ये 1967 मध्ये झाला होता. अक्षयचे खरे नाव राजीव भाटिया आहे. अनेक सुपरहिट चित्रपट देणार्‍या अक्षयचा फिल्मी प्रवास सोपा नव्हता. 1991 मध्ये त्याचा पहिला चित्रपट सौगंध होता जो सुपरफ्लॉप ठरला होता. तथापि, त्याने आपल्या कष्टाने बॉलिवूडमध्ये उच्च स्थान मिळवले.

अक्षय कुमारशी डिंपल कपाडिया ची मुलगी ट्विंकल खन्नाचे लग्न होण्यापूर्वी अक्षय चे भावी सासू डिंपल कपाडियाने अक्षय ला “गे” म्हणजेच “समलिंगी” समजत होती. पण जेव्हा अक्षय कुमारला त्याची भावी सासू डिंपल कपाडियाचे त्याचे बद्दलचे मत कळले तेव्हा अक्षय ला खूप राग आला होता.

ट्विंकलने सांगितले होते की अक्षयने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. त्यावेळी त्यांचा ‘मेला’ हा चित्रपट रिलीज होणार होता. लग्नाच्या प्रस्तावावर ती म्हणाली होते की जर हा ‘मेला’ चित्रपट फ्लॉप झाला तर ती लग्न करेल. हा चित्रपट फ्लॉप झाला आणि अक्षय कुमार तीची आई डिंपलकडे ट्विंकल चा हात मागण्यासाठी गेला. जेव्हा ट्विंकल ने आईला अक्षयशी लग्न करणार असल्याचे सांगितले तेव्हा तिच्या आईला धक्काच बसला होता.

अक्षयने पुढे असेही सांगितले होते की डिंपलने त्याला ‘स*मलिं*गी’ समजले होते आणि ते समजल्यावर अक्षय ला खूप राग देखील आला होता. अक्षय च्या मते कुंडलि नुसार अनु*वांशिक तपासणी करणे देखील चांगले आहे.

ट्विंकलने सांगितले होते की तिने अक्षयला फक्त 15 दिवसांसाठी बॉयफ्रेंड केले होते. इतकेच नाही तर अक्षयसमोर लग्नासाठी एक अट देखील ठेवण्यात आली होती. वास्तविक, डिम्पलने अक्षयसमोर अशी अट ठेवली की, लग्नापूर्वी त्याला एक वर्षासाठी ट्विंकलसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहावे लागेल. त्यानंतर लग्नाचा निर्णय होईल. अखेर अक्षय-ट्विंकलचे लग्न एका वर्षानंतर झाले.

अक्षय-ट्विंकल यांनी जानेवारी 2001 मध्ये लग्न केले. ट्विंकल यांनी 2002 मध्ये मुलगा आरव यांस जन्म दिला होता तर मुलगी निताराचा जन्म 2012 मध्ये झाला होता. निताराच्या जन्मापूर्वी ट्विंकलने एक अट ठेवली होती की जर अक्षयने चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरूवात केली तर ती दुसर्‍या मुलासाठी योजना आखेल. अक्षयने पत्नीच्या आज्ञेने चित्रपटांच्या निवडीबद्दल क्रमिक विचार करण्यास सुरुवात केली होती.

अक्षयने सांगितले होते की जर त्याचे लग्न झाले नसते तर त्याने डिंपल कपाडिया बरोबर डेटवर जाणे पसंत केले असते. अक्षयनेही असं म्हटलं होतं की – मी डिंपल सोबत रात्रभर तीच्या मुली (ट्विंकल खन्ना) बद्दल बोललो असतो.

अक्षय कुमार इंडस्ट्रीमधील एक सीतारा आहे जो रात्री उशिरापर्यंत काम करत नाही आणि सकाळी पहाटे चार वाजता उठतो. ट्विंकल देखील या जीवनशैलीत त्याचे समर्थन करते. ट्विंकलने सांगितले होते की ती आणि अक्षय रोज रात्री रम्मी खेळून झोपतात.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *