‘या’ एका फोटोने मंदाकिनीचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त झाले, आता करत आहे हे काम

अनेकदा राजकीय लोकांचे गुंडांसोबत फोटो प्रकाशित झाल्याची पाहिले असेल. मात्र, एखादा फोटो अनेकांचे आयुष्य उध्वस्त करण्यास कारणीभूत ठरतो. हे आपण पाहिले असेल. बॉलीवूडमध्ये देखील असे काही प्रकार गेल्या काही काळात झालेले आहेत. आम्ही आपल्याला या लेखात अशाच एका घटनेबद्दल सांगणार आहोत.
1980 च्या काळात मुंबईमध्ये गुंडांचा पर्यायाने अंडरवर्ल्डचा दबदबा निर्माण होत होता. त्याच काळात एक नाव मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये समोर आले. ते म्हणजे दाऊद इब्राहिम कासकर याचे. त्यावेळी दाऊद इब्राहिम याने बॉलीवूडवर आपला दबदबा निर्माण केला होता. खंडणी आणि इतर प्रकरणांमध्ये त्याचे नाव प्रामुख्याने समोर आले होते.
1980 च्या दशकामध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. पदार्पणातच तिने काही चित्रपट हिट देखील दिले. तिचे नाव यास्मिन जोसेफ असे होते. मात्र, बॉलिवूडमध्ये टिकण्यासाठी या नावावर चालणार नव्हते. त्यामुळे तिचे नाव तिने बदलून मंदाकिनी असे ठेवले.
होय आम्ही सांगत आहोत, सुपरहिट अभिनेत्री मंदाकिनीबाबत. मंदाकिनी हिला राज कपूर यांच्या ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाने ओळख मिळाली. या चित्रपटात अनेक बोल्ड सीन देऊन तिने चारचाँद लावले. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यावेळेस मंदाकिनीचा बॉलिवूडमध्ये दबदबा होता. त्यामुळे अनेकांनी तिच्याकडे चित्रपटासाठी विचारणा केली.
मात्र, एकदा एक घटना अशी घडली त्यानंतर तिला कोणी चित्रपटात देखील घेत नव्हते. काही कामानिमित्त मंदाकिनी दुबईला गेली आणि इथे सगळे पाणी मुरले. एक फोटो प्रकाशित झाला. त्यानंतर या अभिनेत्रीचे औषध उद्ध्वस्त झाले. नेमके काय झाले होते आपण पाहूया.
मंदाकिनी अभिनेत्री असल्यामुळे तिचे नेहमी दुबई येथे जाणे व्हायचे. या काळातच एक क्रिकेट मॅच पाहण्यासाठी ती स्टेडियमला गेली होती. याच वेळी तिथे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आला होता. या वेळी दाऊदने तिला हात करून आपल्या शेजारी बसण्यास सांगितले. डॉन असल्यामुळे मंदाकिनी देखील त्याला भेटली. हा फोटो काहीजणांनी प्रकाशित केला.
त्यानंतर मंदाकिनी हीच्या आयुष्यात वादळ निर्माण झाले. दाऊद आणि मंदाकिनी यांनी लग्न देखील केले, आशा देखील अफवा उडाल्याचे मंदाकिनी हिने सांगितले. तसेच मंदाकिनी आणि दाऊद यांचा एक मुलगा असल्याचे देखील सांगण्यात आले होते. मात्र, यात काही तथ्य नाही, असे मंदाकिनी स्पष्ट केले.
मंदाकिनी काही वर्ष बाहेर दुबईत राहिल्याचे देखील सांगण्यात येते.1990 मध्ये तिने विवाह केला. सध्या ती मुंबईत राहते. ती सध्या एक हर्बल पार्लर चालवते. त्यामुळे केवळ एका फोटोमुळे मंदाकिनी सारख्या अभिनेत्रीचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे सांगण्यात येते.