एक वेळ एकही मुलगी भाव देत नव्हती, त्यानंतर ‘या’ अभिनेत्याने केले पाच लग्न

एखाद्या अभिनेत्याला सुरुवातीला अजिबात यश मिळत नाही. मात्र, त्यानंतर त्याला असे यश मिळते की, त्याच्यावर सर्वजण जीव ओवाळून टाकतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक रंजक किस्से पाहायला मिळतात. उदाहरणार्थ मिथुन चक्रवर्ती यांनी सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय गरिबीमध्ये जीवन जगले होते.
त्यानंतर त्यांनी असे यश मिळवले की बॉलिवूडमध्ये त्याची वाहवा झाली. आज मिथुन चक्रवर्ती यांचे ऊटीत मोठ्या प्रमाणात हॉटेल आहेत. असाच काहीसा प्रकार इतर अभिनेत्याच्या बाबतीत देखील झाला आहे. नुकतच निधन झालेल्या इरफान खान यांनी देखील अतिशय गरिबीत जीवन जगले आहे.
होय, आम्ही बोलत आहोत आय, एस, जोहर म्हणजेच इंद्रसेन जोहर यांच्याबद्दल. पूर्वीच्या पाकिस्तानात असलेल्या पंजाब प्रांतात त्यांचा जन्म झाला होता. इंद्रसेन यांचे शिक्षण अर्थशास्त्र व राज्यशास्त्र झाले. चित्रपटात येणे त्यांच्या नशिबातच होते. 1947 मध्ये देशाची फाळणी झाली.
त्याच काळात जोहर आपल्या कुटुंबीयांसोबत पंजाबमधील पटियाला येथे एका लग्नसमारंभासाठी आले होते. तेव्हाच तिकडे लाहोरमध्ये दंगल सुरू झाली. त्यामुळे जोहर यांनी पाकिस्तानात न जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी भारतात काम सुरुवात केली. पदव्या घेऊन ते नोकरीसाठी फिरत राहिले.
त्यांना कुणीतरी सल्ला दिला की, चित्रपटात काम करण्यासाठी प्रयत्न करावे, तेथे शिकलेल्या लोकांची खूप आवश्यकता असते. त्यानुसार त्यांनी एका दिग्दर्शक यांच्यासोबत काम केले. येथून त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात झाली. जोहर यांनी अफसाना या चित्रपटात देखील काम केले.
तसेच त्यांनी हॉलिवूडमध्ये देखील चित्रपटात काम केले होते. डेव्हिड लीन यांच्या अभिनयाने प्रभावित झाले होते. लॉरेन्स ऑफ अरेबिया या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका केली होती. त्यापूर्वी त्यांनी हैरी ब्लॅक आणि नॉर्थवेस्ट फ्रंटियर सारखे चित्रपट देखील केले होते.
त्यानंतर त्यांनी काही चित्रपट केले. तसेच त्यांना क्रिकेट पाण्यासोबत कॉमेंट्री करायची देखील सवय होती राजकारणात देखील त्यांनी नशीब अजमावले होते.
म्हणून केले पाच लग्न..
आय. एस. जोहर यांनी प्रेम आणि लग्न या गोष्टी पण अतिशय उत्कृष्ट केल्या. त्यांनी खूप सारी प्रेम प्रकरण केली आणि त्यानंतर तब्बल पाच लग्न देखील केली. यामुळे त्यांच्यावर अनेकांनी टीकादेखील केली होती. त्यांची पहिली पत्नी रमा बेन्स यांच्याशी त्यांचा घटस्फोट झाला.
मात्र, त्यानंतरही त्यांचे नाते टिकून राहिले. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात प्रोतिमा बेदी देखील आल्या. त्यानंतर सिने फोटोग्राफर जल मिस्त्री यांच्या पत्नी देखील त्यांच्या प्रेमात पडल्या होत्या. यासह त्यांनी पाच लग्न केली.
एक काळ असा होता की लाहोरच्या एफसी कॉलेजच्या मुली त्यांना अजिबात भाव देत नव्हत्या. त्यानंतर त्यांनी पाच वेळा लग्न केले आणि बरीच प्रेम प्रकरण देखील केल्याचे सांगण्यात येते. कॉलेजमध्ये असताना जोहर इतके बारीक होते की त्यांना सर्वजण चिडवायचे.