कोरोना व्हायरसबद्दल ’10 खोट्या गोष्टी’ , ज्या आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे..

कोरोना व्हायरसबद्दल ’10 खोट्या गोष्टी’ , ज्या आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे..

कोरोना या व्हायरसने जगभरात 100 हून अधिक देशांमध्ये आपले पाय पसरविले आहे. भारतात देखील कोरोना व्हायरसने संक्रमित लोकांची संख्या वाढत आहे. आता भारत देशात कोरोना व्हायरस संक्रमित लोकांची संख्या 69 वर पोहोचली आहे. कोरोना व्हायरस हा अत्यंत वेगाने पसरणारा व्हायरस आहे. कोरानो संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर अगदी काही वेळातच याचे संक्रमण होऊ शकते.

त्यामुळे कोरोना व्हायरसबद्दल खूप अफवादेखील पसरत आहे ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाकडून जनजागृती करण्याचे काम सुरू आहे पण तरीदेखील पसरणाऱ्या अफवांमुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. म्हणून आज आपण कोरोना व्हायरसशी निगडित 10 खोटे आणि त्यांचं सत्य पडताळून बघणार आहोत, चला तर मग जाणुन घेऊया.

2. काय संसर्ग म्हणजे मृत्यू?

सत्य : असे काही नाही की, COVID-19 संक्रमण होणे म्हणजे मृत्यू. चीनमध्ये कोरोना संक्रमण प्रभावित 58 हजाराहून अधिक लोक स्वस्थ झाले आहेत. भारतातच 3 लोक या आजाराहून मुक्त झाले आहेत. तज्ज्ञांप्रमाणे या आजारात मृत्यूचा धोका सुमारे 20 टक्के आहे. म्हणून कोराना झाल्यास मृत्यू अटळ नाही.

3. काय पाळीव प्राण्यांहून कोरोनाचा धोका असतो?

सत्य : आतापर्यंत कोणत्याही शोधात असे आढळून आले नाही पण, पाळीव जनावरांमुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन प्रमाणे आतापर्यंत असे कुठलेही प्रकरण समोर आले नाही. पण तरीही जनावरांना हात लावल्यावर साबणाने हात धुणे गरजेचे आहे.

4. काय कोरोनावर औषध सापडलंय?

सत्य- कोरोना व्हायरससाठी आतापर्यंत कुठलंही अँटिडोस बनलेले नाही नाही. जगभरात वैज्ञानिक कोरोनाचा खात्मा करण्यासाठी अँटिडोस शोधत प्रयत्न करत आहे. पण यावर चीनने असा दावा केला आहे की, त्यांनी अँटिडोस शोधला आहे.

5. मुलांमध्ये कोरोनाचा धोका नाही?

सत्य- कोरोना व्हायरसचा धोका लहान मुलांना होत नाही असे नाही, परंतू आतापर्यंत समोर आलेल्या घटनांमध्ये तरुण आणि वयस्करांची संख्या लहान मुलांच्या तुलनेत अधिक आहे अर्थात मुलांवर याचा प्रभाव कमी बघायला मिळत आहे. ‘चायना सीडीसी विकली’ यात प्रकाशित रिसर्चप्रमाणे 10 ते 19 वयोगटातील लोकांपैकी केवळ 1 टक्केच संक्रमण प्रभावित झाले आहेत. 10 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये हे इन्फेक्शन 1 टक्क्यांहून कमी दिसून आलं आणि कोणाच्याही मृत्यूची नोंद नाही.

6. वाढत्या तापमानामुळे विषाणूचा नाश होणार?

सत्य – वाढत्या तापमानामुळे विषाणूचा नष्ट झाल्याचे कुठलेही पुरावे अद्याप सामोरी आले नाही. वाढत्या उष्णतेमुळे विषाणू कमी पसरतात. त्यामुळे विषाणू पसरण्याचा धोका कमी होतो. त्यामागचे कारण असे की विषाणू उष्णतेबद्दल अत्यंत संवेदनशील असतात.

7. कोमट पाण्याने अंघोळ केल्यास संक्रमणाचा धोका कमी होतो

सत्य- हे वस्तुस्थिती खोठी आहे फक्त कोमट पाण्याने अंघोळ केल्याने कोरोनाच्या विषाणूंपासून बचाव होत नसतो. साबणाचा वापर करून आणि हात-पाय वारंवार स्वच्छ धुऊन आणि हात स्वच्छ करणारे औषधाचा वापर करून आपण या पासून बचाव करू शकतो.

8. रोग प्रतिरोधक शक्ती वाढविणारे औषधे कोरोना रोखू शकतात

सत्य- ऍलोपॅथिक, होमिओपॅथी,आयुर्वेदिक औषधे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवून कोरोनापासून आपला बचाव करू शकतात असे शक्य नाही.

9. नाकात ब्लीच लावण्याने कोरोनापासून बचाव?

सत्य- ब्लीच किंवा क्लोरीन सारखे जंतुनाशक सॉल्व्हेंट्स ज्यात 75 टक्के इथेनॉल, पॅरासिटिक ऍसिड आणि क्लोरोफॉर्म असतं, खरं तर कोरोना व्हायरसला पृष्ठभागावरचं नष्ट करू शकतं. परंतू तथ्य हे आहे की असे कीटनाशक त्वचेवर लावल्याने कुठलाही फायदा होत नाही उलट असे रसायन हानिकारक असू शकतात.

10. प्रत्येकाने N95 मास्क घालणे आवश्यक

सत्य- कोरोना संक्रमित रुग्णांसोबत काम करणारे हेल्थ केअर वर्कर्सला N95 मास्क घालणे आवश्यक आहे. सामान्य लोक ज्यांच्या असे कुठलेही लक्षण नाही, त्यांना कुठल्याही मास्कची आवश्यकता नाही. तरी जर आपण सामान्य मास्क घालत असाल तर आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.

जोपर्यंत शासनाकडून कोराना व्हायरस बद्दल कुठलीही माहिती प्रसिद्ध केली जात नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका. वारंवार आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि तुम्हाला शंका असल्यास आपल्या जवळच्या रुग्णालयात जा.

NEWS UPDATE

One thought on “कोरोना व्हायरसबद्दल ’10 खोट्या गोष्टी’ , ज्या आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे..

  1. Mala ase vate jar immunity storng asel tar ha rog hot nahi jar apan imunity sarkhe dose kele tar ha rag bara hoyil ase mala vate

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *