फॅन्ड्री’तील जब्या झाला मोठा सहा वर्षानंतर दिसतो ‘असा’ . तो सध्या काय करतो?

मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी काही वर्षांपूर्वी पिस्तुल्या हा लघुपट निर्माण केला होता. यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. त्यानंतर त्यांनी ग्रामीण धाटणीचे अनेक चित्रपट बनवले.
आजवर आपण नागराज मंजुळे यांचे चित्रपट पाहिले तर आपल्याला असे लक्षात येईल की, त्यांचे सर्व चित्रपट हे प्रेमकथेवर आधारलेले असतात. यात गरीब अभिनेता तर श्रीमंत अभिनेत्री अशी त्यांच्या चित्रपटाची थीम असते.
त्यामुळे नागराज मंजुळे यांचा सोलापूर जिल्ह्यातील केमगाव येथे सत्कार आयोजित करण्यात आला होता. याच गावामध्ये हलगी वाजवताना जब्या म्हणजे सोमनाथ अवघडे याला पहिल्यांदा मंजुळे यांनी पाहिले होते. त्यानंतर त्यांनी सोमनाथला आपल्या चित्रपटात घेण्याचे ठरवले होते.
त्यानंतर त्यांनी सोमनाथ यांना याबाबत विचारणा केली होती. आधी तो हो म्हणाला होता. मात्र, प्रत्यक्षात चित्रीकरण सुरू झाल्यावर तो आठ दिवस मंजुळे यांना भेटतच नव्हता. मग त्यांनी मोठ्या प्रयत्नांनी त्याला चित्रपटासाठी तयार केले.
त्यानंतर फॅन्ड्री नावारूपास आला. फॅन्ड्री ही कथा ग्रामीण भागातील एका मुलाची आहे. याच गावात राहणाऱ्या राजश्री खरात म्हणजे शालूवर जब्याचे प्रेम असते. मात्र ही कहाणी अधुरी राहते, अशी या चित्रपटाची कथा होती. यात शालूने एक शब्दही न बोलता भाव खाल्ला होता.
तर जब्याने आपल्या अभिनयाची सर्वांनाच भुरळ पडली होती. या चित्रपटासाठी सोमनाथला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. काही वर्षांपूर्वी त्याने मुलाखत दिली होती. त्यात तो खूप लाजत होता. आगामी काही चित्रपटात तो लवकर दिसू शकतो, असे सांगण्यात येते.
काही वर्षांपूर्वी त्याने दहावीची परीक्षा देखील दिली आहे. तर सोमनाथ आता थोडा वेगळा दिसत असून त्याचे राहणीमान आता पूर्णपणे बदलले आहे. फॅन्ड्री चित्रपटामुळे त्याला जब्या हे नाव मिळाले आहे.
किशोर कदम यांच्या भूमिकेचेही कौतुक
या चित्रपटांमध्ये जब्याच्या वडिलांची भूमिका किशोर कदम यांनी केली होती. चित्रपटात त्यांचे नाव नाना होते. किशोर कदम यांनी आपल्या भूमिकेला चांगला न्याय दिला होता. त्यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होताना त्या वेळी पाहायला मिळाले होते. त्यांनी साकारलेला नाना हा सर्वांनाच आवडला.