करिश्मा कपूरला घर चालवण्यासाठी करावे लागत आहे ‘हे’ काम.. वाचून धक्का बसेल..

बॉलीवूड मध्ये कपूर घराण्याचे नाव खूप मोठे आहे. कपूर घराण्यामध्ये पृथ्वीराज कपूर, राज कपूर, शम्मी कपूर, ऋषी कपूर यांचा समावेश होतो. काही दिवसांपूर्वी ऋषी कपूर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर संपूर्ण कपूर कुटुंब एकत्र आल्याचे पाहायला मिळाले होते. शम्मी कपूर यांनी देखील बॉलीवुड गाजवून सोडले आहे.
राज कपूर यांनी अनेक हिट चित्रपट देऊन कपूर घराण्याचे नाव रोशन केले आहे. याच प्रमाणे ऋषी कपूर, रणबिर कपूर, राजीव कपूर यांनीदेखील बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. या पिढ्यांच्या पुढच्या पिढ्या देखील बॉलिवूड मध्ये आज राज्य करत आहेत. त्यामध्ये करिश्मा कपूर, करीना कपूर यांनी देखील अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
त्यावेळी या दोघांच्या चित्रपटांनी धम्माल उडवून दिली होती. सिल्वर जुबली चित्रपट झाल्यानंतर देखील थेटर मधून त्यांचे चित्रपट खाली उतरत नव्हते. करिष्मा कपूर एन भरात असताना तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिने दिल्ली स्थित बिझनेस मॅन संजय कपूर यांच्या सोबत लग्न केले. काही वर्ष दोघांचा संसार अगदी नेटाने चालला.
दोघांना एक मुलगा व एक मुलगी असे अपत्य आहेत. मात्र, कालांतराने दोघांमध्ये खटके उडू लागले. त्यानंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार करिश्मा कपूर हिने घटस्फोट घेतला असून ती आता मुंबई मध्ये राहते. सध्या तिला चित्रपटात ऑफर तर मिळत नाहीतच. मात्र, घर चालवण्यासाठी ती वेगवेगळे उद्योग करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
ती एका चारीटेबल ट्रस्टसाठी काम करते. ही चारीटेबल ट्रस्ट महिलांसाठी काम करत असते. यामध्ये ती काही गुंतवणूक करून आपले मन रमवते. तसेच तिला पती कडून दर महिन्याला दहा लाख रुपये मिळतात. या दहा लाख रुपयावर दोन मुलांना घेऊन आपला संसाराचा गाडा हाकत आहे. तसेच यातील काही पैसे ती चारीटेबल ट्रस्टला देखील लावत असल्याचे समोर आले आहे.
सध्या तिला काही शो ऑफर देखील येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सध्या कोरोना महामारी मुळे लागलेल्या लॉक डाउन मुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. त्यामुळे सध्याच्या मालिकांचे चित्रीकरण होईल का नाही हे सांगणे शक्य होणार नाही. एकूणच करिष्मा कपूर ही पतीच्या मिळणाऱ्या पोटगीवर सध्या जगत असल्याचे चित्र आहे.