घर खर्च चालवण्यासाठी कॉल सेंटरवर काम करायची, पण आज आहे सलमानची टॉप हिरोईन

घर खर्च चालवण्यासाठी कॉल सेंटरवर काम करायची, पण आज आहे सलमानची टॉप हिरोईन

बॉलिवूडमध्ये येण्याआधी अनेक कलाकारांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. याबाबतच्या बातम्या आपण वाचल्या असतीलच. जुन्या काळात अनेक अभिनेते रस्त्यावर राहून जीवन जगले आहेत. त्यानंतर त्यांना यश मिळाले आहे. अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी देखील रस्त्यावर राहून आपले करिअर घडवले. आज तो खूप मोठा अभिनेता आहे.

अशाच काही अभिनेत्री अभिनेता देखील बॉलिवूडमध्ये पाहायला मिळतात. अक्षय कुमार हा बॉलिवूडमध्ये येण्याआधी आचारी होता. तसेच कष्ट करून त्याने आपले करिअर बनवले.

आज आम्ही आपल्याला ज्या अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत की, तिने बॉलीवूडमध्ये येण्याआधी काय काम केले. घर खर्च चालवण्यासाठी ती खूप मेहनत घेत होती.

आम्ही आपल्याला सांगत आहोत अभिनेत्री झरीन खान हीच्याबाबत… झरीन खान घर खर्च चालवण्यासाठी याआधी कॉल सेंटरमध्ये काम करत होती. काही वर्षांपूर्वी झरिनने बॉलीवूडमध्ये आपला चांगला जम बसवलेला आहे. झरीन बारावीमध्ये असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला.

त्यामुळे सर्व जबाबदारी तिच्या खांद्यावर पडली. घर चालवण्यासाठी ती सर्वत्र कामाचा शोध घेत होती. त्यानंतर तिला एका कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली. कॉल सेंटरमध्ये काम करून ती घरखर्च चालवत होती. अशातच तिने मॉडेलिंग देखील सुरू केले. त्यानंतर युवराज चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी सलमान खानला झरीन खान पहिल्यांदा दिसली.

त्यानंतर त्याने तिला चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. त्यानंतर सलमान आणि तिचा वीर हा चित्रपट प्रदर्शित झाला. सध्या झरीन खानकडे अनेक चित्रपट आहेत.

बॉलीवूडमध्ये येण्याआधी होते 100 किलो वजन

झरीन खान बॉलीवूडमध्ये येण्याआधी तिचे वजन तब्बल शंभर किलो होते. त्यामुळे तिला अनेकजण चिडवत असे. बॉलिवूडमध्ये आल्यानंतर तिने आपले वजन घटवून खूप कमी केले होते. तसेच ती कटरीना कैफसारखी दिसते, अशी छाप देखील तिच्यावर पडली होती. आपल्याला पाकिस्तानी खेळाडू शाहिद आफ्रिदी खूप आवडत असल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.

तसेच अस्कर २ या चित्रपटासाठी नरेंद्र बजाज यांनी आपल्याला धोका दिल्याचं तिने म्हटले होते. आधी या चित्रपटात पूर्ण कपड्यावर चित्रीकरण होईल, असे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात चित्रीकरण सुरू झाले त्यावेळी मात्र मला कमी कपडे घालण्यास सांगण्यात आले, असेही ती म्हणाली. त्यानंतर हा वाद पेटला होता.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *