पाहा ‘हा’ होता बॉलिवूडमधील तब्बल चार मिनिटांचा पहिला किसिंग सिन…

जागतिकीकरणानंतर आधुनिक सिनेमाचा चेहरामोहराच बदलून गेला. रोजच्या जीवनशैलीमध्ये झालेले, नातेसंबंधांमधील, राहणीमानामधील बदल हे आधुनिक सिनेमामध्येसुद्धा टिपले गेले.
जागतिकीकरणानंतर प्रेमाच्या अभिव्यक्तीचे झालेले बाजारीकरण आधुनिक सिनेमामध्ये प्रतीत होऊ लागले. कोणत्याही सिनेमामध्ये पटकथेची निकड या नावाखाली बोल्ड सीन्स व बोल्ड कथानकाला प्राधान्य दिले जाऊ लागले.
अशा परिस्थितीमध्ये पुरुष स्त्रियांच्या भूमिका करत असत. मात्र भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये काळाची गरज ओळखून आपल्या भूमिकेला न्याय देण्याच्या भावनेतून अशाच एका महान अभिनेत्रीने ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांच्या काळामध्ये तब्बल चार मिनिटांचा किसिंग सीन दिला होता हे ऐकले तर निश्चितच अचंबित व्हाल.
1933 साली बॉलीवूड मधील अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या देविकाराणी आणि हिमांशू राय यांचा कर्मा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट एकाच वेळी हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.
या चित्रपटाने त्याकाळात ही अगदी रेकॉर्डब्रेक अशी कमाई केली होती व हा चित्रपट प्रेक्षकांच्या ही तुफान पसंतीस उतरला होता यामागे प्रमुख कारण म्हणजे या चित्रपटांमध्ये देविका राणी यांनी दिलेला चार मिनिटांचा किसिंग सीन होय. त्यानंतर देविका यांनी ३५ वेळा किसिंग सीन दिले. हे सीन त्याकाळी सर्वात बोल्ड सीन म्हणून ओळखले गेले होते.
याआधी कोणत्याही अभिनेत्रीने किसिंग सीन देण्याचे धाडस केले नव्हते. देविकाराणी यांनी दिलेल्या या आँनस्क्रीन कीस मुळे भारतीय चित्रपट सृष्टी मध्ये एक नवीन पर्व सुरू झाले. त्यानंतर इतर अभिनेत्र्याही किसिंग सिन द्यायला सहज तयार होऊ लागल्या.
त्यानंतर अनेक अभिनेत्यांनी जिथे गरज असेल तिथे तिथे किसिंग सीन्स दिले मात्र आज सुद्धा बॉलीवूड मध्ये पहिला किसिंग सीन देण्याच्या जणूकाही विक्रमाची नोंद ही देविका राणीच्या नावावर आहे.