हनुमान ब्रह्मास्त्रचा सामना करू शकत होते का?

हनुमान ब्रह्मास्त्रचा सामना करू शकत होते का?

बल, विवेक आणि विज्ञानाची देवता म्हणून हनुमानाकडे पाहिले जाते. हनुमान हा शक्तिशाली आणि सर्वगुणसंपन्न असा रामभक्त होता. या लेखामध्ये आम्ही हनुमानाबाबत आपल्याला अनेक रहस्यमय बाबी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात.

पवनपुत्र हनुमान हे अतिशय ताकदवान होते. बुद्धी सोबतच भक्ती काय असावी, हे त्यांच्याकडून शिकायला हवे. म्हणूनच हनुमानाचे लाखो भक्त पाहायला मिळतात.

हनुमानचा मृत्यू स्वतःहून वाटत नाही तोपर्यंत होणार नाही, असे त्यांना वरदान देण्यात आले होते. देवराज इंद्राने देखील हनुमानाला अमरत्वाचे वरदान दिले होते. तसेच त्यांचा मृत्यू इच्छेनुसार होईल, असेही संबोधले होते.

सुंदर कांडामध्ये हनुमान यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येते. त्यावर हनुमान रावणाला म्हणतो की, माझ्यावर कुठेही अस्त्राचा प्रभाव होणार नाही. तरीदेखील मी तुला भेटायला आलो आहे. त्यानंतर इंद्रजीताने हनुमानावर ब्रह्मास्त्र चालवून त्याला बंदी बनवले होते. मात्र, इंद्रदेवाचा सन्मान ठेवण्यासाठी हनुमानाने हे कृत्य केले होते.

त्यानंतर मुख्य युद्धामध्ये मेघनादाने ब्रह्मास्त्र चालून राम-लक्ष्मण यांच्यासह वानर सेनेला बेशुद्ध केले होते. मात्र, यातून केवळ हनुमान आणि बिभीषण शुद्धीवर होते. त्यानंतर हनुमानाने संजीवनी पर्वत उचलून आणून राम-लक्ष्मणाला सह सर्वांना संजीवनी देऊन शुद्धीवर आणले होते.

हनुमानावर ब्रह्मास्त्र जरी चालत नव्हते तरी त्यांच्यावर इतर अस्त्र चालत होते की नव्हतं याबाबत सांगणे योग्य ठरणार नाही. हनुमानाचे कुंभकरणासोबत भयंकर युद्ध झाले होते. या वेळी कुंभकरण आणि त्याचे शुल अस्त्र त्याच्यावर चालवले होते.

मात्र, त्यचा हनुमानावर काही परिणाम झाला नव्हता. हा घाव हनुमानाने सहज पेलला होता. कुंभकर्णने वानर सेनेला नेस्तनाबूत केले होते. शूल अस्त्रने अंगदलही घायाळ केले होते. त्यानंतर त्याने सुग्रीवावर वार केला होता. मात्र, हनुमानाने तो वार हवेतच नष्ट केला होता.

मृत्यूची देवता यमाने हनुमानाला अमरत्व बहाल केले होते. विश्वकर्मा यांनी देखील वरदान दिले होते. त्यांनी बनवलेल्या वस्तूपासून त्याचे कायम संरक्षण होईल. हनुमाना बुद्धीची देवता सोबत बलाची देवता देखील आहे. ब्रह्मास्त्र हनुमानाचे काही करू शकत नव्हते. हनुमान सर्वांचे रक्षण करतो.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.