कोटींच्या प्रॉपर्टीचे मालक असूनही ‘हे 5’ सेलिब्रेटी व्यसनापासून दोन हात लांबच राहतात..

कोटींच्या प्रॉपर्टीचे मालक असूनही ‘हे 5’ सेलिब्रेटी व्यसनापासून दोन हात लांबच राहतात..

आजकाल श्रीमंत लोक फक्त फॅशन म्हणून व्यसन करतात. हे व्यसन कुणी पैसा आहेत म्हणून करत तर कुणी आपली श्रीमंती दाखवण्यासाठी व्यसन करत. मात्र हे व्यसन करत असताना आपल्या शरीराला याचे किती घातक परिणाम होऊ शकतात हे त्यांच्या लक्षात येत नाही. पण याला काही बॉलिवूड कलाकार अपवाद आहेत. या कलाकारांकडे कोटींची संपत्ती असूनही हे व्यसनासारख्या घातक गोष्टींपासून लांबच राहतात.

1. अक्षय कुमार
बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार बद्दल तर सर्वांनाच माहिती आहे. अक्षय कुमार आपल्या फिटनेससाठी आजही जागरूक आहे. अक्षय कुमारने आजपर्यंत त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कधीच दारू सिगारेटचे सेवन केले नाही.

१९८४ मध्ये अमिताभ बच्चन यांचा शराबी चित्रपट प्रदर्शित झाला होता. यात त्यांनी एका दारूड्याची भूमिका केली होती. ही भूमिका त्यांनी इतकी अप्रतिम केली होती की ते प्रेक्षकांना अगदी खरेखुरे दारुडे वाटले होते. परंतु, अमिताभ बच्चन त्यांच्या वैयक्तिक आयुष्य या सगळ्या गोष्टींपासून लांब आहेत.

3. जॉन अब्राहम
२००७ मध्ये नो स्मोकिंग या चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना जॉन अब्राहमला चित्रपटाच्या गरजेसाठी व आपली भूमिका पार पाडण्यासाठी त्याला दिवसाला ९० सिगारेट ओढाव्या लागत होत्या. दरम्यान चित्रपटाची शूटिंग संपल्यानंतर जॉन ने त्याच्या छातीचा एक्सरे करून घेतला.

तेव्हा त्याला समजले की, अतिप्रमाणात सिगारेटचे सेवन केल्यामुळे त्याचे फुप्फुसे पूर्णपणे काळी पडली आहेत. म्हणून त्यानंतर त्याने स्वतः ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी कधीच सिगारेट आणि दारूचे सेवन केले नाही.

4. शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टीला आपण तिच्या फिटनेससाठी ओळखतो. शिल्पा तिच्या युट्यूब चॅनलमार्फत लोकांना फिटनेसचे धडे देत असते. स्वतःला फिट ठेवण्यासाठी शिल्पा नेहमी योगा व डाएटचा करते. मसालेदार पदार्थां असो किंवा दारू सिगारेट यांसारख्या गोष्टींपासून शिल्पा नेहमी लांबच राहते.

5. दीपिका पदुकोण
बॉलिवूडची सध्याची आघाडीची अभिनेत्री म्हणून दीपिका पदुकोण नावारूपाला आली आहे. तिने तिच्या उत्तम अभिनयाने बॉलिवूड मध्ये आपले एक विशिष्ट स्थान निर्माण केले आहे. तयाचबरोबर ती श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत देखील समाविष्ट आहे. दीपिकाने सुरुवातीपासून ते आतपर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दीपिका देखील दारू सिगारेट पासून दोन हात लांबच राहणे पसंत करते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *