शेतात काम करायला मजूर मिळत नसल्याने ‘हे’ कलाकार स्वतःच करताय शेती, एक तर आहे दिगग्ज दिग्दर्शक आणि अभिनेता: पहा व्हिडिओ

शेतात काम करायला मजूर मिळत नसल्याने ‘हे’ कलाकार स्वतःच करताय शेती, एक तर आहे दिगग्ज दिग्दर्शक आणि अभिनेता: पहा व्हिडिओ

मराठी चित्रपट, नाट्य अभिनेता प्रवीण तरडे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील मुळाशी तालुक्यातील जाताडे येथे झालेला आहे. प्रवीण तरडे हे शाळा-कॉलेजात असताना कबड्डी, सॉफ्टबॉलचे राष्ट्रीय खेळाडू होते. त्यांनी यशवंतराव मोहिते महाविद्यालयात असताना पुरुषोत्तम स्पर्धेसाठी एकांकिका लिहिली. त्यानंतर त्यांचा खऱ्या अर्थाने चित्रपटाकडे प्रवास सुरू झाला.

सुनील कुलकर्णी हे त्यांचे नाट्यक्षेत्रातले गुरू होत.प्रवीण तरडे यांनी आजवर अनेक मालिका आणि चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच अनेक मालिकांसाठी त्यांनी संवाद लेखन देखील केले आहे. देऊळबंद या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. त्यांचा काही वर्षांपूर्वी आलेला मुळशी पॅटर्न हा चित्रपट प्रचंड गाजला होता.

या चित्रपटाने त्यांना मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक नवीन ओळख निर्माण करून दिली होती. सध्या ते एका वेगळ्या प्रोजेक्टवर काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, लॉक डाऊन मुळे सध्या चित्रीकरण बंद आहे. त्यामुळे काहीही चित्रीकरण त्यांना करता येत नाही. लॉक डाउन काळातील त्यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये प्रवीण तरडे पत्नीसह मुळशी पॅटर्नचे कलाकार शेतामध्ये राबताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये त्यांनी अतिशय मोलाचा संदेश देखील दिलेला आहे. त्याचे असे झाले की, फादर्स डेचे औचित्य साधून प्रवीण तरडे यांनी वडिलांना शुभेच्छा देण्यासाठी एक वेगळा उपक्रम राबवला. प्रवीण तरडे यांचे गाव पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील जाता डे हे होय.

येथे त्यांची काही एकर जमीन देखील आहे. प्रवीण तरडे यांचे नाट्य व चित्रपटावर प्रेम असले तरी त्यांचा शेतीवर अजूनही विश्वास आहे. ते शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला देखील देतात. ते म्हणतात की, शेतीशी इमान राखले पाहिजे. शेती कधीही विकली नाही पाहिजे. शेती आपली आई आहे, असे देखील त्यांनी सांगितले.

प्रवीण तरडे यांनी व्हिडिओमध्ये सर्वांवर कॅमेरा रोखून सांगतात की, लॉक डाऊन मुळे आम्हाला शेतात मजूर भेटत नाहीये. त्यामुळे आम्ही भात लागवड करण्यासाठी मुळशी पॅटर्नची सर्व टीम घेऊन शेतात आलेलो आहोत. कॅमेरा सुरुवातीला ते मुळशी पॅटर्न चा कलाकार देवेंद्र गायकवाड यांच्यावर दाखवतात.

हा माझा मित्र असून तो शेतात लागवड करण्यासाठी माझ्याकडे आलेला आहे, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी वडील विठ्ठल राव यांची ओळख करून दिली आणि सांगितले की, विठ्ठल राव माझे वडील असून यांचा आज वाढदिवस आहे. आणि हा वाढदिवस अशा अनोख्या पद्धतीने साजरा करत आहोत.

त्यानंतर आई रुक्मिणी यांच्यावर कॅमेरा त्यांनी दाखवला आणि ही माझी आई असल्याचे सांगितले तसेच दरवर्षी हे वारी करण्यासाठी पंढरपूरला जातात मात्र यंदा वारी झाली नाही त्यामुळे ते शेतात आल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतर त्यांनी कॅमेरा त्यांची पत्नी स्नेहल तरडे यांच्यावर रोखला आणि यादेखील शब्दा शेतात काम करत आहेत असे सांगितले.

त्यानंतर चित्रपटातील कलाकार सुन्या 32 याच्यावर कॅमेरा रोखून त्याची देखील त्यांनी ओळख सांगितली तसेच प्रवीण तरडे यांनी यावेळी शेतात भात लागवड कशी करतात याबाबत सविस्तर माहिती दिली दाढ पेरणी काय असते तसेच शेतात पाणी कसे राहतात याबाबतही त्यांनी माहिती दिली.

प्रवीण तरडे यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे एक कलाकार असून देखील जमिनीची इमान राखताना ते दिसत आहेत त्यामुळे त्यांची सर्व वाहवा होत आहे मुळात प्रवीण तरडे हे ग्रामीण भागात असलेले कलाकार असले तरी त्यांची नाळ पुण्याशी देखील जुळलेली आहे पटकथालेखक अभिनय दिग्दर्शन या सर्वच क्षेत्रात ते बाजी मारताना दिसतात.

त्यांच्या आगामी चित्रपटांची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे.प्रवीण तरडे यांचा मुळशी पॅटर्न चित्रपट मराठी मध्ये एक नवा पायंडा घेऊन आला होता. त्यानंतर या धाटणीचे चित्रपट मराठी सृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात बनू लागले.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *