अरे हे काय ? ‘शक्ती’ला नाही तर ‘या’ परदेशी मुलीला डेट करतोय राघव जुयाल? फोटो शेअर करून दिली माहिती..

डान्स इंडिया डान्स या रियालिटी शोने आपल्याला अनेक उत्तम असे कलाकर दिले. याच शोच्या तिसऱ्या सिझनमध्ये ‘कॉकरोझ’ नावाच्या एका डान्सरने ऑडिशन दिले होते. त्याची डान्स स्टाईल अगदी हटके होती, मात्र सुरुवातीला जजेसला ती हवी तेवढी भोवली नाही आणि म्हणून त्याला रिजेक्ट करण्यात आले.
पण तोपर्यंतच त्याची लोकप्रियता इतकी जास्त वाढली होती की, शोच्या मेकर्सला त्याला पुन्हा शोमध्ये घ्यावे लागले. तो कॉकरोझ म्हणजेच राघव जुयालचा प्रवास सुरु झाला. रिजेक्शन पासून राघवचा प्रवास सुरु झाला, आणि आज तो एक मोठा सेलेब्रिटी बनला आहे. राघव सुरुवातीपासूनच एक बिनधास्त अशा व्यक्तिमत्वासाठी ओळखला जातो.
शक्ती आणि राघव दोघांनी अनेकवेळा शोमध्ये रोमँटिक डान्स देखील केला आहे. त्यांच्या जोडीचा मोठा चाहतावर्ग आहे. त्या दोघांना बघून अनेकांना, ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत असंच वाटतं. अनेकांनी तशी इच्छा देखील व्यक्ती केली होती. मात्र,आता राघवच्या खऱ्या गर्लफ्रेंडचा खुलासा झाला आहे.
राघवच्या आयुष्यात ती खास व्यक्ती म्हणून, शक्ती नाही तर दुसरी मुलगी आहे. सारा (Sara Arrhusius ) नावाच्या मुलीवर राघवाचे प्रेम आहे. सारा एक स्वीडिश मुलगी आहे. ती देखील फिल्म इंडस्ट्रीशी निगडित आहे. ती नेटफ्लिक्स इंडियाच्या अनेक प्रोजेक्ट साठी काम करते. विशेष म्हणजे ती एक इंटेमसी कॉर्डीनेटर आहे.
सिनेमामध्ये, सिरीजमध्ये किंवा मालिकांमध्ये जे लव्ह-मेकिंग सिन आपण बघतो ते डायरेक्ट करण्याचे काम हे इंटेमसी कॉर्डीनेटर करतात. साराने अनेक वेगवेगळ्या प्रोजेक्टसवर काम केले आहे. आपल्या कामानिमित्त ती भारतात येतच असते. एकदा भारतात आल्यानंतर ती ट्रेकिंग साठी गेली होती. तिथेच तिची आणि राघवची ओळख झाली.
हळूहळू हि ओळख प्रेमात रूपांतरित झाली. २०१७ पासून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच सांगितलं जात आहे. मात्र त्याबद्दल केवळ त्यांच्या जवळच्या खास मित्रपरिवारालाच माहित आहे. त्यांनी आपले नाते अजूनपर्यंत गुपित ठेवले आहे. यामागचे कारण अजूनपर्यंत समजले नसले तरीही, कदाचित आपली प्रायव्हसी जपून ठेवण्यासाठी त्यांनी असं केलं असावं. इंस्टाग्रामवर त्यांचे अनेक फोटोज आहेत. राघव आणि सारा दोघेही सोबत खूपच छान दिसतात.