‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री आहे ‘शिवाजी साटम’ यांची सून, चार वेळा मिळाला आहे राज्य पुरस्कार अनेक चित्रपटात केले काम.

प्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम यांना आपण ओळखत असालच. शिवाजी साटम यांनी मराठीसह बॉलिवूड आणि हिंदी चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
तसेच त्यांची सीआयडी या मालिकेने तब्बल वीस वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. शिवाजी साटम यांचे बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट गाजले होते. त्यानंतर त्यांना सोनी वाहिनीकडून सीआयडी या मालिकेसाठी विचारणा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी या मालिकेसाठी होकार दिला.
अभिनेते शिवाजी साटम यांच्या सुनबाईचे नाव मधुरा वेलणकर असे आहे शिवाजी साटम यांचा मुलगा अभिजित याच्याशी तिचे लग्न झाले आहे. मधुराचा जन्म 8 ऑक्टोबर 1981 मध्ये झालेला आहे. तिला युवान नावाचा मुलगा आहे.
आजवर तिला चित्रपट व नाट्य भूमिकांसाठी चार वेळा राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच राष्ट्रपती भवनात देखील तिने नृत्याचा कार्यक्रम केला आहे. तिच्या अभिनयाने मोहित होऊन अनेकांनी आपल्या चित्रपटात काम दिले. सध्या तिने एका पुस्तकाचे लिखाण केले असून ती लेखिका बनली आहे.
अनेक मालिकात केले काम
अभिनेत्री मधुरा वेलणकर हिने आपल्या करिअरची सुरुवात काही मालिकांमधून केलेली आहे. तिने मृण्मयी, चक्रव्यूह, सांज सावल्या आपलंच घर, सात जन्माच्या गाठी, अनामिका या आणि इतर मालिकांसाठी काम केले आहे.
यातील मृण्मयी ही मालिका प्रचंड गाजली होती. तसेच आजवर तिने 75 वर शो केले आहेत. नॉट ओन्ली मिसेस राऊत मधली भूमिका गाजली.
मधुरा वेलणकर हिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यात सरीवर सरी, नॉट ओन्ली मिसेस राऊत, खबरदार, मातीच्या चुली, गोंजरी आई नंबर१, मी अमृता बोलते, मेड इन चायना, उलाढाल, एक डाव धोबीपछाड, जनगणमन यासह हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. जॉनी जॉनी येस पप्पा हा चित्रपट चालला होता.