‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधील गॅरीची खरी बायको आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री. फोटो एकदा बघाच !

सध्या चित्रपटाप्रमाणे मालिकाही सर्वाधिक लोकप्रिय होत आहेत, आणि मालिकांच्या कथा लोकांना आवडत आहेत. त्यामुळे लोक आता मालिका आवर्जून बघतात. झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ खरे पाहता लोकांच्या पसंतीस उतरलेली मालिका आहे. आणि टीआरपीच्या मध्येही ही मालिका नेहमी अव्वल असते. तर याच मालिकेतून घरात घरा-घरात पोहोचलेल्या गॅरीची बायको कोण आहे तुम्हाला माहिती आहे का ?
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनाया, राधिका आणि गुरुनाथ या व्यक्तिरेखांना लोकांनी प्रचंड प्रेम दिले आहे. या मालिकेत राधिकाला धोका दिलेल्या गॅरीची भूमिका नकारात्मक असली तरी खऱ्या जीवनात लोकांना तो तितकाच आवडतो. गॅरी म्हणजे अभिनेता अभिजित खांडकेकर त्याच्या बायकोचं नाव आहे सुखदा खांडकेकर.
या कपलने लव मॅरेज केलं आहे. एका कॉमन फ्रेंडमुळे अभिजीत आणि सुखदा या दोघांची ओळख झाली आणि या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर काही वर्षे डेट केल्यावर हे दोघे लग्नबंधनात अडकले. सुखदा मालिकांमध्ये काम करत नसली तरी सोशल मीडियावर की खूप ॲक्टीव असते. दोघेही एकमेकांसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असतात, त्यावरून ते एकमेकांना किती प्रेम करतात हे लक्षात येते.
सुखदाही एक उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे सुखदा ही कथ्थक नृत्यांगना आहे. ती सध्या हिंदी सिनेसृष्टी मध्ये काम करत आहे. ‘हीच तर प्रेमाची गंमत आहे’ आणि मकरंद देशपांडे यांच्या ‘शेक्सपिअरचा म्हतारा’ या मराठी नाटकात तीने काम केलं आहे.
सुखदाने देवदास, कनुप्रिया, डूबधान, धारा की कहानी आणि उमराव अशा हिंदी नाटकांमध्ये तिने काम केले आहे. विशेष बाब म्हणजे सुखदाने संजय लीला भंसाली यांच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटातही काम केले आहे.