विवेक ऑबेरॉयच्या ‘या’ एका चुकीमुळे ऐश्वर्याने त्याचासोबत ब्रेकअप केला होता..

विवेक ऑबेरॉयच्या ‘या’ एका चुकीमुळे ऐश्वर्याने त्याचासोबत ब्रेकअप केला होता..

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता विवेक ऑबेरॉय यांच्या अफेअरची काही वर्षांपूर्वी चांगलीच चर्चा रंगली होती. या नात्याबद्दल कधीच ऐश्वर्याने सांगितले नाही. मात्र विवेक ऑबेरॉयने हॉटेल रूममध्ये केलेल्या एका मोठ्या चुकीमुळे ऐश्वर्या रायने त्याच्याशी बोलणे बंद केले.

त्याआधी ऐश्वर्याचे सलमानशी अफेयर होते हे आपण सर्वांना माहीत आहे. त्यावेळी सलमानसोबतचे ऐश्वर्याचे अफेयर चांगलेच गाजले होते.

याचदरम्यान, तिच्या आयुष्यात विवेक ऑबेरॉयची एंट्री झाली. क्यों हो गया ना या चित्रपटानंतर ते दोघे अनेक सार्वजनिक ठिकाणांवर एकत्र दिसत असत. ऐश्वर्या आणि विवेक नात्यात असल्याची मीडियात चर्चा असली ती ऐश्वर्याने याची कधीच कबुली दिली नाही.

पण विवेकने अप्रत्यक्षपणे या गोष्टीविषयी मीडियात सांगितले होते. त्यांच्यात सगळे काही सुरळीत असताना विवेकच्या एका चुकीने त्या दोघांच्या नात्यात दुरावा आला.

विवेकने एका हॉटेलच्या रुममध्ये पत्रकार परिषद बोलावली होती आणि त्यात त्याने थेट सलमानवर आरोप केला. सलमानने त्याला फोनवरून मारण्याची धमकी दिली असे त्याने या पत्रकार परिषदेत सांगितले होते.

या सगळ्यामुळे चांगलाच वाद रंगला होता. पण या सगळ्यात माझा काहीही संबंध नसल्याचे ऐश्वर्याने मीडियाला सांगितले होते आणि तेव्हापासून तिने विवेकसोबत बोलणेच बंद केले.

या सगळ्या गोष्टी घडल्या, त्यावेळी सलमान खान हा स्टार होता. ऐश्वर्याने देखील अनेक हिट चित्रपट दिले होते. पण विवेकचे करियर नुकतेच बॉलिवूडमध्ये सुरू झाले होते. या घटनेचा विवेकच्या करियरवर देखील चांगलाच परिणाम झाला

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *