‘ही’ मराठमोळी अभिनेत्री पुन्हा एकदा डॉक्टर बनून, करत आहे लोकांची मदत !

देशामध्ये कोरोना विषाणूचे मोठे संकट उभे राहिले आहे. जो तो आपल्या परीने जसे जमेल तशी मदत करत आहे. उद्योजक अनेक गरिबांना अन्न धान्य देत आहेत, तर काही सामाजिक संस्था दररोज गरिबांना जेवण बनवून देत आहेत.
यामध्ये बॉलिवूड कलाकार देखील मोठ्या संख्येने समोर आले आहेत. यात मराठी कलाकारांनी देखील मदतीचा हात समोर केला आहे. रितेश देशमुख आणि इतर मंडळी मोठ्या प्रमाणात बॅकस्टेज कलाकारांना मदत करत आहेत.
दे दनादन, स्माईल प्लीज या आणि इतर चित्रपटांचा समावेश आहे. त्यानंतर तिने मफजल लकडावाला याच्यासोबत लग्न केले. मात्र, काही कारणाने हा विवाह जास्त काळ टिकू शकला नाही. या दोघांना एक मुलगी आहे.
कोरोना महामारीचे संकट आल्यापासून अनेक जण आपल्या परीने समाजासाठी काही ना काही कर्तव्य करत आहेत. यामध्ये आदिती गोवित्रीकर देखील पुढे आली आहे. समाज माध्यमातून ती अनेकांसोबत लाईव्ह करून कोरोना आजारापासून वाचण्यासाठी सल्ले देत आहे.
काही दिवसापूर्वी रिद्धिमा कपूर, रितेश देशमुख यांच्या सोबतीने लाईव्ह केले होते. आदिती ही प्रख्यात डॉक्टर असल्याने अनेक जण तिचा सल्ला घेण्यासाठी समोर येत आहेत.
डॉक्टर ते अभिनेत्री असा आहे प्रवास
आदिती गोवित्रीकर हिचा जन्म 21 मे 1976 चा आहे. पनवेलमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात तिचा जन्म झाला. 1997 मध्ये मुंबईतील एका महाविद्यालयातून मेडिकलचे शिक्षण पूर्ण केले.
काही वर्ष प्रॅक्टिस देखील केली. त्यानंतर तिने बॉलीवूडमध्ये प्रवेश करून काही चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती मालिका आणि समाज माध्यमावर कार्यरत आहे.
मिस वर्ल्डची मानकरी
आदिती हिला २००१ मध्ये मिस वर्ल्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याआधी तिला राजीव गांधी हा देखील पुरस्कार मिळाला आहे. तसंच महाराष्ट्ररत्न पुरस्कार मिळाला आहे. अतिशय अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेली ही अभिनेत्री सध्या कोरोना व्हायरस या संकटापासून वाचण्यासाठी अनेकांना सल्ले देत आहे. त्यामुळे तिचे सर्वस्तरातून मोठे कौतुक होत आहे.