मालिकेतील संस्कारी सुनेने तोडल्या ‘बोल्डनेस’च्या सर्व मर्यदा, व्हिडिओ पाहून तुमच्याही उंचावतील भुवया…

मालिकेतील संस्कारी सुनेने तोडल्या ‘बोल्डनेस’च्या सर्व मर्यदा, व्हिडिओ पाहून तुमच्याही उंचावतील भुवया…

मालिकांमध्ये आपल्याला अगदी सध्या सरळ दिसणाऱ्या बहू, आपल्या सोज्वळ रूपात सर्वांचे मन जिंकतात. उंची घागरे किंवा, साड्या, कधीही डोक्यावरून खाली न पडणारा पदर, नाही तर कमीत कमी सुंदर असे भरजरीत सलवार सूट अशा अगदी संस्कारी पोशाखात नेहमीच मालिकांमधल्या सुनावावरताना दिसतात.

त्यामुळे एकदम संस्कारी अशी त्यांची इमेज बनून जाते. कित्येक काळ त्यांची हीच इमेज राहते. पण अनेक वेळा, साधारण आयुष्यात वावरताना त्यांना यामुळे समस्या देखील होतात. आपल्या खऱ्या आयुष्यात अय अभिनेत्री नेहमीच साड्या किंवा सलवार सूट घालत नाही. साधारण मुलींप्रमाणे त्यासुद्धा, अगदी साधे कपडे घालतात. जीन्स-टॉप्स, साधे ड्रेस आणि मिनी स्कर्ट हे सर्व त्या अभिनेत्रींना देखील आवडतात.

मात्र, नेहमीच टिपिकल भारतीय पोषाखातच बघण्याची सवय झाल्यामुळे, अनेक वेळा चाहते त्यांना या कपड्यांमध्ये बघून ओळखत सुद्धा नाही. हिना खानला आजही तिचे चाहते अक्षरा याच नावाने ओळखतात. स्टार प्लसच्या ये रिश्ता क्या केहलता है या मालिकेतून टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणाऱ्या अक्षराने, चाहत्यांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली.

अक्षराच्या सोज्वळ आणि भोळ्या लूकने तिला घराघरात पोहचवले. कित्येक वर्ष हिना खानने या मालिकेत काम केले. मात्र, तेच काम करुन तिला तिचे करियर कंटाळवाणे झाल्याचे जाणवत होते. मालिकेच्या प्रत्येक एपिसोड साठी तिला जवळपास १.२५ लाख रुपये मानधन मिळत होते. मात्र, तरीदेखील तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.

तिला आपली इमेज बदलायची होती आणि म्हणून तिने प्रथम रियालिटी शोजला प्राधान्य दिले. सर्वात प्रथम तिने खतरों के खिलाडी शोमध्ये सहभाग नोंदवला. या शोमधून तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या शोने तिला नव्याने फॅन्स दिले. त्यानंतर तिने लगेच टेलिव्हिजन मधल्या सगळ्यात मोठ्या रियालिटी शो म्हणजेच बिग बॉस ११ मध्ये भाग घेतला.

त्या सिजनची ती, सर्वात जास्त मानधन घेणारी सेलेब्रिटी ठरली. शिल्पा शिंदेच्या तुलनेत ती कमी पडली असली तरीही, तिने या शोमधून प्रचंड मोठा चाहतावर्ग कमवला. आणि त्यामुळे तिला काही सिनेमामध्ये देखील काम करण्याची संधी मिळाली. तिने लाईन्स या काश्मीर-पा’किस्तान मुद्द्यावर आधारित शॉर्ट सिनेमामध्ये काम केले होते.

तिच्या या सिनेमामुळे तिला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये जाण्याची संधी मिळाली. कान्सच्या रेड कार्पेटवर तिने आपल्या ग्लॅमरस लूकने सर्वाना चकित केले होते. ती नेहमीच आपल्या सोशल मीडियावरून, स्वतःचे वेगवेगळे फोटोज चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या ग्लॅमरस आणि हॉट लुकला चाहत्यांची प्रचंड पसंती मिळते. नुकतंच तिने आपला एका हॉट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

तिच्या या व्हिडियोमध्ये तिने हॉट कपडे तर घातलेच आहेत, मात्र तिचा अंदाज, हावभाड देखील अत्यंत हॉट आणि मादक बघायला मिळत आहेत. तिच्या या व्हिडियोवर लाखो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. संस्कारी बहूला हे काय झालं, असं अनेकांनी कमेंट केले आहे. पण तिच्या मादक अंदाजाने अनेकांना घायाळ केले आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *