सुरुवातीला हिट चित्रपट दिल्यानंतर गायब झाल्या ‘या’ सहा अभिनेत्री, नंबर 6 ने अमीरसोबत कमविले 100 कोटी

सुरुवातीला हिट चित्रपट दिल्यानंतर गायब झाल्या ‘या’ सहा अभिनेत्री, नंबर 6 ने अमीरसोबत कमविले 100 कोटी

बॉलिवूडमध्ये उगवत्या सूर्याला नमस्कार, असाच काहीसा प्रकार पहायला मिळतो. तुमचे सौंदर्य आणि वय कितपत आहे. यावर देखील काही वेळेस तुम्हाला यश मिळण्याची शक्यता असते. मात्र, बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत की, ज्यांनी सुरुवातीला अतिशय धमाकेदार कामगिरी केली.

त्यानंतर त्यांना चित्रपटात यश म्हणावे तसे मिळालेच नाही. यामध्ये उदाहरण म्हणजे राजेंद्र कुमार यांचा मुलगा कुमार गौरव याचे नाव घ्यावे लागेल. सुरुवातीला नाम सारखा प्रचंड मोठा हिट चित्रपट केला. त्यानंतर त्याला काही चित्रपट मिळाले. मात्र, त्याला यश मिळवता आले नाही.

2: शमिता शेट्टी : शेट्टी हे नाव तसे बॉलिवूडला नवीन नाही. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने बॉलीवूड प्रचंड गाजवले आहे आणि सध्या ती चित्रपटातही काम करत नसली तरी आपल्या समाजकार्य यातून अनेकांचे मनोरंजन करत असते. त्यामुळे तिची ओळख अजून कोणीही विसरले नाही. याउलट मात्र तिच्या बहिणीची अवस्था आहे.

तिच्या बहिणीचे नाव सर्वांना माहितीच आहे. ती म्हणजे शमिता शेट्टी. 2000 मध्ये यश चोप्रा यांच्या मोहब्बते या चित्रपटातून पदार्पण केले. हा चित्रपट प्रचंड गाजला. त्यानंतर तिने काही चित्रपट केले. मात्र, तिला अपेक्षित यश मिळाले नाही. ती सध्या आपल्या बहिणी सोबतच राहते.


3. रिंकी खन्ना : या अभिनेत्रीची ओळख देखील वडील राजेश खन्ना व अभिनेत्री ट्विंकल खन्ना हीची बहीण म्हणून जास्त आहे. टिंकल खन्ना हिने 1999 मध्ये प्यार मे कभी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने गोविंदासोबत जिस देश मे गंगा रहता है या चित्रपटात काम केले.

मात्र, अतिशय कमकुवत अभिनयामुळे तिची कुठे चर्चा झाली नाही. त्यानंतर करीना कपूरच्या चमेली या चित्रपटात शेवटची ती दिसली. आता ती चित्रपटापासून दोन हात लांबच आहे.

4. अमृता अरोरा : अमृता अरोरा या नावाची ओळख देखील मलाइका अरोरा हिची बहीण म्हणून च आहे. स्वतःचे असे तिला करियर करता आले नाही. 2002 मध्ये तिने कितने दूर कितने पास या चित्रपटातून पदार्पण केले होते.

या चित्रपटात अभिनेता फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खान होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिस फार टिकला नाही. त्यानंतर अमृता अरोरा हिने लग्न केले. आता ती बॉलीवूड पासून दूरच आहे.

5. लिसा रे : लिसा रे ही अभिनेत्री अतिशय सुंदर आहे. 2001 मध्ये तिने कसूर या चित्रपटात काम केले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट झाला होता. या चित्रपटांमध्ये आफताब शिवदासानी याची भूमिका होती. या चित्रपटातील गाणी सर्वदूर गाजली होती.

त्यानंतर मात्र तिला मोजक्याच चित्रपटात भूमिका मिळाल्या. काही दिवसांपूर्वी तिने एका वेब सिरीजमध्ये काम केले होते. स्तनाचा कॅन्सर झाल्याने ती मध्यंतरी चर्चेत आली होती. आता छोटे-मोठे काम करून ती आपले करिअर सावरत आहे.


6.तिस्का चोपडा: 1993 मध्ये सुपरस्टार अजय देवगन याच्यासोबत तिने प्लॅटफॉर्म या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर तिला काही चित्रपटात भूमिका मिळाल्या होत्या.

तारे जमीन पर या चित्रपटातील ईशानच्या आईची भूमिका केली होती. सध्या तिला काही छोटे-मोठे रोल मिळत आहेत. मात्र, अभिनेत्री म्हणून तिला अपेक्षित यश मिळाले नाही.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *