आजोबाच्या संपत्तीवर नातवाचा किती हक्क असतो? जाणून घ्या ‘या’ लेखामधून

सध्याच्या जमान्यामध्ये संपत्तीसाठी मोठ्या प्रमाणात भां’डणे होताना आपण पाहत असतो. उदाहरणात घ्यायचे झाले तर जुन्या काळामध्ये अनेक घरांमध्ये 6ते7 अपत्य असायचे. पुढे चालून या सहा अपत्यांमध्ये संपत्तीवरून प्रचंड वा’द व्हायचे. काही जण भविष्याचा विचार करून सुरुवातीलाच वाटण्या करून टाकतात. मात्र, अनेक जण एकत्र कुटुंब पद्धती असल्याचे सांगून वाटण्या करत नाहीत. त्यामुळे भविष्यामध्ये अशा प्रकरणात वाद मोठ्या प्रमाणात होत असतात. काही दिवसांपूर्वीच को’र्टाने मुलींना वडिलांच्या संपत्तीमध्ये समान हक्क असल्याचा न्याय निवाडा दिला आहे. त्यामुळे आता मुलींना देखील आपल्या वडिलांच्या संपत्तीत हिस्सा मिळणार आहे. मात्र, वडिलांनी स्व कष्टाची संपत्ती कमावली असेल, तर त्यांना संपत्ती कोणाला द्यायची याचा देखील कायद्यात समावेश आहे.
मात्र, वडिलांची संपत्ती ही त्यांच्या वडिलांनी कमावली असेल, तर नातवाला किंवा मुलीला देखील त्याच्यामध्ये हक्क मागण्याचा अधिकार देखील असल्याचे सांगण्यात येते. नातवंड हा कुणाचा संपत्तीत हक्क मागू शकतो. आम्ही आपल्याला या लेखात सांगणार आहोत.
नातवंडांचा आजाेबाच्या संपतीत हक्क
वडिलोपार्जित मालमत्तेत नातवंडांचा समान वाटा आहे. नातवाने नातवाच्या नातवाला मालमत्तेतील हिस्सा देण्यास नकार दिल्यास, नातवाला अंतरिम दिलासा मिळण्यासाठी याचिकांसह घोषणा आणि विभाजनासाठी दिवाणी खटला दाखल करू शकतो. कायद्यात दिलेल्या अधिकारांपासून कोणालाही वंचित ठेवता येणार नाही, असेही नमूद आहे.
आजोबांची स्वकष्टार्जित मालमत्ता
आजोबांच्या स्व-अधिग्रहित मालमत्ता म्हणजे आजोबांनी स्वत: कष्ट करुन विकत घेतलेल्या नातवाचा जन्मसिद्ध हक्क नाही. जर ती संपत्ती नातवाच्या वडिलांना म्हणजे आजोबांच्या मुलाला दिली गेली असेल, तरच त्यावर नातवाचा हक्क राहील. त्यामुळे नातवाला या प्रकरणात थेटपणे संपत्तीत हक्क मागता येणार नाही, असेही म्हटले जाते.
हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 अंतर्गत वारस म्हणून, त्याला दावा करण्याचा अधिकार नाही. आजोबा ही मालमत्ता कोणत्याही व्यक्तीला देऊ शकतात. त्यामुळे आजोबांच्या संपत्तीवर नातवंड थेटपणे हक्क सांगू शकत नाही, याचेही प्रावधान आहे.
ही माहिती पूर्णत: तांत्रिक आहे. आपल्याला जर अधिक माहिती हवी, असल्यास आपण आपल्या वकिलाचा सल्ला घ्यावा.