हृतिक रोशनसारखा डान्स करून एका रात्रीत स्टार होणारा ‘हा’ TikTok युजर आहे तरी कोण?

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येणार नाही. कधी कधी इंटरनेटवर असं टॅलेंट पहायला मिळते ज्यांना संधी न मिळाल्यामुळे किंवा साधनं न मिळाल्यामुळे त्यांच्यातील टॅलेंटला वाव मिळत नाही. याचं ताजं उदाहरण म्हणजे रानू मंडल आणि मायकल जॅक्सनसारखे डान्स करणारा मुलगा.
त्यांचे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यामुळे त्यांच्यातील टॅलेंट जगासमोर आले. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. जो खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती खूप दमदार डान्स करताना दिसतो आहे.
हा व्यक्ती टिकटॉकवर आपले व्हिडिओ शेअर करत असते आणि हृतिक रोशनने कित्येक गाण्यावर डान्स केला आहे. या व्यक्तीची स्टाईल सर्वांना खूप भावते.
कभी खुशी कभी गम चित्रपटातील यू आर माय सोनिया हे गाणं सध्या खूप चर्चेत आले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. टिकटॉकवर या व्यक्तीचे जवळपास 896.4 हजार फॉलोव्हर्स आहेत आणि या व्हिडिओला ट्विटरवर देखील हजारो लोकांनी लाईक केले आहे.
अरमान राठोड 28 वर्षांचा असून त्याचे खरे नाव संजय राठोड आहे. त्याचा डान्स पाहून लोकांनी त्याला हे नाव दिले आहे.
गुजरातमधील वलसाडचा येथील गरीब कुटुंबातील संजय कपड्यांमुळे ट्रोल होत आहे. पण संजयने म्हटले आहे की ज्याला माझे वास्तव पहायचे आहे त्याने माझ्या घरी यावे. तसेच अरमानने सांगितले की, चांगल्या कापड्यांसोबत माझे काही फोटो एडिट केले आहेत ज्याला लोक खरे समजत आहेत.