‘Indian Idol’ मधील ‘ही’ जोडी अडकली लग्नबेडीत ? सोशल मीडियावर फोटो होताय व्हायरल…

‘Indian Idol’ मधील ‘ही’ जोडी अडकली लग्नबेडीत ? सोशल मीडियावर फोटो होताय व्हायरल…

रियालिटी शो छोट्या पडद्यावरील एक अविभाज्य घटक बनला आहे. सध्या छोट्या पडद्यावर अनेक रियालिटी शो सुरु आहेत, आणि त्यांचा टीआरपी देखील चांगला आहे. सुरुवातीच्या काळात रियालिटी शो म्हणून इंडियन आयडल, सा रे ग म प, बुगी वुगी, रोडीज असे काही मोजकेच कार्यक्रम सर्वांना माहीत होते.

मात्र आज केवळ शनिवार-रविवारच नाही तर, वीकडेजलासुद्धा अनेक रियालिटी शो सुरू असतात. कोण बनेगा करोडपती, बिग बॉस असे अनेक रियालिटी शो छोट्या पडद्यावर आपल्याला बघायला मिळतात. रियालिटी शोजच चाहतावर्ग देखील भलामोठा आहे. यामध्ये वेगवेगळ्या रियालिटी शोचा वेगळा चाहतावर्ग आहे.

तसे बघता रियालिटी शोचे ट्रेंड आपल्या देशामध्ये इंडियन आयडल ह्या म्युझिक रियालिटी शोने सुरू केले. पहिला सिझन देशात जवळपास सर्वांनीच मोठ्या उत्सुकतेने पाहिला. मराठमोळा अभिजीत सावंत पहिला इंडियन आयडल बनला. त्यानंतर कायमच इंडियन आयडल या रियालिटी शोचा टीआरपी वाढतच गेला. इंडियन आयडल नंतर अनेक रियालिटी शोज आपल्या देशामध्ये आले.

डान्स इंडिया डान्स, इंडियाज गॉट टॅलेंट असे अनेक वेगवेगळे रियालिटी शोज सुरु झाले आणि त्यांचा टीआरपी देखील उत्तम आहे. नुकतच इंडियन आयडल या शोने आपला बारावा सिझन पूर्ण केला आहे. मात्र इंडियन आयडलचा हा सीजन सुरुवातीपासूनच वा’दाच्या भो’वर्‍यात सापडला होता. या रियालिटी शोमध्ये, रियल असे काहीच नाही असे आ’रोप अनेकांनी केले होते.

याप्रकारचे आरोप प्रत्येक, रियालिटी शोवर अनेक वेळा होतच असतात. केवळ टीआरपीसाठी रियालिटी शोमध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात आणि शो संपल्यानंतर त्यापैकी काहीही तुम्हाला बघायला मिळत नाही, असे खूप वेळा सर्वांनी पाहिले आहे. शो सुरू असताना भांडण, वाद, प्रतिस्पर्धा आणि प्रेम या सर्वांना चांगलंच मिर्च-मसाला लावून प्रेक्षकांना दाखवला जातो.

आणि हे सर्व बघताना प्रेक्षकांचे देखील भरघोस मनोरंजन होते, त्यामुळे रियालिटी शोमध्ये जुळलेले नाते हे तेवढ्यापुरतेच असते असे अनेकांना वाटते. मात्र अशाच शोजमध्ये काही खरे नाते देखील बनतात, हे आपण पाहिले आहे. अशी अनेक जोडपी आपण बघितली आहेत. मात्र, रियालिटी शोमध्ये टीआरपी वाढण्यासाठी खोट्या जोड्या बनवल्या जातात, हे देखील तेवढेच सत्य आहे.

पण ते नाते खरे आहे की खोटं, हे वेळच ठरवते. असेच काही यंदाच्या इंडियन आयडलच्या पर्वामध्ये देखील बघायला मिळाले. अरूनिता आणि पवनदीप या दोघांचे इंडियन आयडल सुरू असतानाच एकमेकांवर प्रेम जडले होते. आणि आता या दोघांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. अरूनिता आणि पवनदीपचा एक फोटो सोशल मीडियावर तु’फान व्हा’यरल होत आहे.

या फोटोमध्ये हे दोघेही नवीन जोडप्याप्रमाणे दिसत आहेत. अरूनिताने लाल रंगाचा लेहंगा घातला आहे आणि त्यामध्ये ती नववधूच दिसत आहे. तर पवनदिपणे सुंदर अशी शेरवानी घातली आहे. त्या दोघांच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्स आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. काही चाहत्यांनी त्यांना एडिटिंग खूप चांगल्या प्रकारे केली आहे, असे म्हटले आहे. तर काहींनी खरंच तुम्ही लग्न केला आहे का, असा प्रश्न विचारला आहे.

‘आजकाल ही एक ट्रेंडच बनली आहे. अशा प्रकारचे फोटोज वा’यरल करायचे. असं दाखवायचं की,आम्ही लग्न केलं आहे. आणि नंतर खुलासा होतो एखाद्या शूटिंगसाठी असा लूक होता. खरं समजणार कस?’ असं कमेंट एका नेटकऱ्याने केले आहे. तूर्तास अरूनिता आणि पवनदीप या दोघांकडून, याबद्दल कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण अद्याप आलेले नाही.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *