संपूर्ण वादावर ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांचं नव ‘अस्त्र’ विरोधकांची झाली पंचाईत..

संपूर्ण वादावर ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांचं नव ‘अस्त्र’ विरोधकांची झाली पंचाईत..

तृप्ती देसाईने इंदुरीकर महाराज्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी केल्यानंतर, संपूर्ण सोशल मीडियावर इंदुरीकर महाराज यांच्या समर्थकांचं सोशल मीडियावर अक्षरशः वादळ आलं आहे. इंदुरीकर महाराजांचं नाव वापरून आपल्याला प्रसिद्धी मिळेल यामुळे इंदुरीकर महाराजांवर टीका केली जात असल्याचा आरोप इंदुरीकर महाराज समर्थकांकडून केला जात आहे.

सोशल मीडियावर फक्त #wesupportindurikarmaharaj ही हॅश टॅग ट्रेंडिंग मध्ये सुरू आहे. तृप्ती देसाईंने फक्त प्रसिद्धी साठी इंदुरीकर महाराज यांचा नावाचा वापर केल्याचे दिसून येत आहे.

म्हणून नगरमध्ये इंदुरीकर समर्थकांनी चलो नगरचा नारा दिला होता. पण यावर इंदुरीकरांनी आपल्या समर्थकांना लेखी आवाहन केलं आहे. चलो नगर म्हणत मोर्चा काढू नका, गर्दी जमवू नका, कायदा व सुव्यवस्था राखा, असं आवाहन इंदुरीकरांनी समर्थकांना केलं आहे.

इंदुरीकर सर्व विषयांवर बोलणार आहेत, पण समविषम वादावर काहीही बोलणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. यामुळे इंदुरीकरांचं ‘मौन अस्त्र’ विरोध करणाऱ्यांना घायाळ करणार असल्याचं दिसून येत आहे.

इंदुरीकर महाराज किर्तनामध्ये सर्व विषयावर बोलणार आहे पण समविषम वादावर बोलणार नाही, अस स्पष्ट दिसत आहे. इंदुरीकर महाराज यांनी धारण केलेल्या मौन व्रतमुळे मात्र विरोधकांची पंचाईत होताना दिसत आहे.

काहीच वाद नसताना तृप्ती देसाईने हा वाद निर्माण केला आहे. आणि त्यामुळे हा डाव तिच्यावरच उलटला असून तिला सोशल मीडियावर टीकेला सामोरे जावे लागत आहे. म्हणून तिने गृहमंत्र्याची भेट घेऊन टीका टीका करणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. पण अजूनही गृहमंत्री यांनी याच्यावर आपले कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.