IPL 2021: क्रिकेटप्रेमींसाठी खुश खबर, इंग्लंडमध्ये खेळले जाऊ शकतील आयपीएलचे उर्वरित सामने ! समोर आली मोठी बातमी…

IPL 2021: क्रिकेटप्रेमींसाठी खुश खबर, इंग्लंडमध्ये खेळले जाऊ शकतील आयपीएलचे उर्वरित सामने ! समोर आली मोठी बातमी…

यंदाचा, आयपीएलचा १४ वा सीझन को’रो’नाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनिश्चित काळासाठी आयपीएल स्थगित ह्यामध्ये करण्यात आली आहे. त्याचबरोबर, सप्टेंबरमध्ये आयपीएलचं आयोजन पुन्हा करण्यात येईल, असं सांगितलं जात आहे.

आयपीएल रद्द झाल्यामुळे क्रिकेटप्रेमी चांगलेच नाराज झाले आहेत व ह्या चाहत्यांना आयपीएलचं आयोजन पुन्हा कधी, केव्हा आणि कुठे करण्यात येणार याबद्दल उत्सुकता देखील आहे. अशातच आयपीएलच्या आयोजनाबाबत मोठी बातमी नुकतीच हाती आली आहे.

४ मे रोजी मंगळवारी आयपीएल गवर्निंग काउंसिलची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. ह्या बैठकीमध्ये बीसीसीआयनं आयपीएल रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. बायो बबलमध्ये असूनदेखील को’रो’नाची ला’गण झाल्यानं बीसीसीआयच्या वतीनं आयपीएलचे उर्वरित सामने आता अनिश्चित काळाकरिता स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

इंग्लिश काउंटी कडून आयपीएलच्या आयोजनासाठी आला प्रस्ताव

समोर आलेल्या मीडियाच्या रिपोर्टनुसार, इंग्लिश काउंटीच्या एका ग्रुपने यंदाच्या आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचं आयोजन सप्टेंबर महिन्यामध्ये करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
ESPNcricinfo ने दिलेल्या माहितीनुसार, एमसीसी, सर्रे, वार्विकशायर आणि लंकशायरने ईसीबीला एक पत्र पाठवलं आहे.

या पत्रामध्ये यंदाच्या वर्षी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आयपीएल चे उर्वरित सामने इंग्लंडमध्ये खेळवण्यासाठी प्रस्ताव पाठवन्यात आला आहे. दरम्यान, इंडियन क्रिकेट टीम यंदाच्या वर्षी इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये टीम इंडियाद्वारे इंग्लंडच्या विरोधात ५ कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.

अशातच असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की, इंग्लंडच्या विरोधातील कसोटी मालिका पार पडली की, आयसीसी विश्वचषकाच्यापूर्वी टीम इंडियाकडे वेळ असणार आहे. म्हणून यादरम्यान आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचं आयोजन केलं जाऊ शकतं. दरम्यान , ह्याबद्दल अजून ठाम वक्तव्य बीसीसीआय कडून आलेलं नाहीये.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.