आपल्या पश्चात कुटुंबासाठी ‘एवढी’ संपत्ती सोडून गेला इरफान खान !

आपल्या पश्चात कुटुंबासाठी ‘एवढी’ संपत्ती सोडून गेला इरफान खान !

जगण्यावर प्रेम करायला शिकवणारा दिग्गज अभिनेता पद्मश्री इरफान खान यांचे मुंबईत नुक्तेच दुर्धर कॅन्सरच्या आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय केवळ 53 वर्ष होते. इरफानच्या मृत्यूनंतर अनेकांनी त्याला श्रद्धांजली वाहिली. इरफान याचा आपल्या कुटुंबीयांमध्ये खूप जीव होता.

इरफान याच्या कुटंबात पत्नी सुतापा सिकंदर, मुले बबिल खान, आयान खान, बहीण रुकासाना खान, भाऊ इम्रान खान आणि सलमान खान यांचा समावेश आहे. इरफान यांचा जन्म ७ जानेवारी १९६७ रोजी राजस्थानमधील टोक या गावात झाला होता. घरची परिस्थिती खूप बिकट असल्यामुळे तो कामासाठी मुंबईमध्ये आला.

यासोबतच इरफानने जाहिरात क्षेत्रांमध्ये सुद्धा चांगले नाव कमावले होते. अतिशय गरिबीच्या परिस्थितीतून वर आलेल्या या अभिनेत्याला श्रीमंत झाल्यावर देखील गरीबी काय असते हे चांगलेच माहीत होते. चित्रपट आणि इतर संस्थांच्या माध्यमातून त्यांनी तब्बल ३२१ कोटी रुपये कमावले. आपल्या कुटुंबीयांच्या नावे एवढी मोठी संपत्ती मागे सोडून गेला आहे.

हॉलीवूडमध्ये देखील धबधबा

इरफान खानने बॉलिवूड सोबतच हॉलीवुड या चित्रपटांमध्ये देखील अनेक चित्रपटात काम केले आहे. यात द वॉरियर, जुरासिक वर्ल्ड, स्लमडॉग मिलेनियर, लाईफ ऑफ पाय, या आणि इतर चित्रपटात त्यांनी काम करून आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. आगामी काळात देखील हॉलीवुडमधून त्याला विचारणा करण्यात आली होती. मात्र, आजारपणामुळे तो सध्या काम करू शकत नव्हता.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *