कोरोना व्हायरस : जगाला जमलं नाही ते ‘भारतानं’ करून दाखवलं!

कोरोना व्हायरस : जगाला जमलं नाही ते ‘भारतानं’ करून दाखवलं!

जगातील महासत्ता पैकी एक मानला जाणाऱ्या चीनला नैसर्गिक आपत्तीने अक्षरशः गुडघे टेकवायला जणू भाग पाडले आहे. निसर्गाच्या नियमांच्या कक्षा मोडून जेव्हा मनुष्य आपले आहार, जीवनपद्धती बदलू पाहतो तेव्हा त्याचा दुष्परिणाम हा मनुष्यजातीलाच भोगावा लागतो हे कोरोना व्हायरसच्या सध्या संपूर्ण जगभरात चीनमधून सर्वात प्रथम पसरलेल्या व्हायरसने सिद्ध केले आहे

.चीन नंतर इटली भारत, इराण या अन्य देशांमध्ये सुद्धा कोरोना व्हायरसचा विळखा पडू लागला आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर हा व्हायरस शरीरातून पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आवश्यक उपचार आणि औषधे तात्काळ उपलब्ध करून देण्यात भारत हा आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.

देशभरामध्ये एकूण 71 कोरोना वायरस ग्रस्त रुग्ण हे सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या काटेकोर देखरेखीखाली आहेत व त्यांच्यावर आवश्यक ते उपचार उपलब्ध करून देण्यामध्ये सार्वजनिक सरकारी आरोग्य विभागाला यश मिळाले आहे. या  सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे ही सूत्रांकडून कळते।

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक योजना करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने ज्या राज्यांमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत त्या ठिकाणच्या राज्य सरकारांनी सार्वजनिक ठिकाणी व गर्दीच्या ठिकाणी वावरण्यास प्रतिबंध घातला आहे. महाविद्यालय, शाळा इत्यादींना सुट्टी जाहीर करण्यात आली असून जिम, चित्रपटगृहे ,नाट्यगृहे, जलतरण तलाव, क्रीडांगणे यावरही वावर करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

विदेशातून भारतात परत आलेल्या भारतीय व्यक्तींची कोरोना वायरस तपासणीसाठी ची टेस्ट लगोलग केली जात आहे. त्यामध्ये सुद्धा चीन वरून परत आलेल्या प्रवाशांची. टेस्ट निगेटिव आल्यानंतरसुद्धा त्यांना सरकारी रुग्णालयांमध्ये 72 तास देखरेखीखाली ठेवण्यात आले व त्यांना डिस्चार्ज दिल्यानंतर 24तास घरांमध्ये त्यांना स्वतंत्रपणे ठेवण्यात आले आहे जेणेकरून कोरोना व्हायरसची लागण रोखली जाऊ शकेल.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *