दिव्या भारतीच्या मृत्युनंतर घडल्या होत्या अनेक विचित्र गोष्टी, आईनेच केला मोठा खुलासा…

बॉलिवूड अभिनेत्री दिव्या भारती आजही प्रेक्षकांच्या ह्रदयात जिवंत आहे. तिच्या रसिकतेने प्रेक्षकांच्या मनात तिने आपलं स्थान निर्माण केलं. दिव्या भारताने फक्त तीनच वर्ष बॉलिवूडमध्ये काम करू शकली. पण या तीन वर्षांच्या छोट्या कारकिर्दीत तिने अनेक हिट चित्रपट दिले. सगळं सुरळीत सुरू असताना वयाच्या 19 व्या वर्षी अपार्टमेंटच्या खिडकीतून पडून तिचा मृत्यू झाला.
5 एप्रिल 1993 रोजी 11 वाजता अचानक दिव्या भारतीचा मृत्यू झाला. दिव्या तिच्या वर्सोवा येथील मजल्यावरील अपार्टमेंटच्या बाल्कनीतून पडली. पण ती पडली की तिला कुणी ढकललं हे अजूनही एक रहस्यच आहे. दिव्याचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या मृत्यूची बातमी बॉलिवूड मध्ये वाऱ्याच्या वेगाने पसरली. त्यानंतर 2 दिवसांनी तिचा अंतिम संस्कार करण्यात आले.
रंग चित्रपटात दिव्या भारतीसोबत आयशा जुल्काने काम केलं. आयशा जुल्काने बीबीसीला सांगितलं होतं की, दिव्याच्या निधनानंतर एक खूप मोठी विचित्र गोष्ट घडली. काही महिन्यानंतर आम्ही रंग चित्रपटाचा ट्रायल पाहण्यासाठी फिल्मसिटीला गेलो होतो. दिव्या जशी स्क्रीनवर आली तशी स्क्रीन खाली पडली. आम्हाला हे खूप विचित्र वाटलं.
आयशा जुल्काने पुढे मुलाखतीत सांगितले होते की, खूप वेळ विश्वासच बसला नाही. एक आणखीन विचित्र बाब आहे की कदाचित तिला काहीतरी माहित होते. ती नेहमी म्हणायची की, लवकर करा, लवकर चला, जीवन खूप छोटं आहे. तिने कधी स्पष्ट सांगितलं नाही मात्र कदाचित माणसांच्या आतमध्ये एक इंपल्स असतात. तिला प्रत्येक काम लवकर करायचं होतं. तिला जीवनात सगळं काही लवकर मिळत होते.
ती स्वतः सांगायची की तिलाच काही समजत नाही. असं वाटतं की कदाचित तिला माहित होतं की ती आपल्यात जास्त दिवस नसेल. दिव्याच्या मृत्यूनंतर अनेक विचित्र किस्से समोर आले होते. खुद्द दिव्या भारतीच्या आईने सांगितले होते की, दिव्याच्या निधनानंतर दिव्या त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांना उठवायची. जेव्हा त्याना लवकर उठायचे होते, त्यावेळी दिव्या स्वप्नात येत होती. इतकेच नाही तर दिव्या साजिद नाडियादवालाची दुसरी पत्नी वर्धाच्या स्वप्नात येत होती.