जया बच्चनच्या ‘या’ एका हरकतीमुळे भयंकर चिडली होती ऐश्वर्या, म्हणाली अशी चूक प्रत्येक घरातील सासू का करते?…

ऐश्वर्या राय आणि जया बच्चन ही बॉलिवूडची प्रसिद्ध सासू-सुनेची यांची जोडी आहे. त्यांना एकाच वेळी सोबत असताना अनेक वेळा पब्लिक प्लेस मध्ये स्पॉट केले गेले आहे. त्यांच्यामधील ट्यूनिंगबाबत इंडस्ट्रीमध्ये बर्याच गोष्टी चालू असतात. असे म्हटले जाते की ऐश्वर्या शांत स्वभावाची आहे तर जया क्रोधित स्वभावाची आहे.
तसे, बर्याच लोकांना जया बच्चनच्या रागाची माहिती आहे. तिच्याबद्दल टीका करत होत असल्याने तीला अनेक मराठी माध्यमांवर भडकताना पाहिले गेले आहे. दुसरीकडे ऐश्वर्या प्रत्येकाशी अत्यंत नम्र स्वभावाने वागते. अशा परिस्थितीत एक क्षण आला जेव्हा ऐश्वर्या तीची सासू जयावर खूप रागावली होती.
या व्यतिरिक्त अशी एक बातमीही ऐकायला मिळाली की ऐश्वर्याला जयाचा तीच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा होणारा हस्तक्षेप आवडत नाही. तथापि, नंतर ही बातमी केवळ एक अफवा होती. तसे, सर्वसाधारणपणे, बहुतेक सूना अश्या आहेत की त्यांना त्यांच्या आयुष्यात सासूचा हस्तक्षेप होणे आवडत नाही. आज आपण बघुयात की कोणत्या कोणत्या गोष्टींमुळे सून आणि सासूच्या नात्यात दुरावस्था निर्माण होऊ शकते.
नवरा बायकोचे वैयक्तिक जीवन :नवरा आणि बायकोमध्ये प्रेम होणे आणि भांडणे दोन्हिही खूप सामान्य गोष्ट आहेत. हे दोघेही वेळोवेळी त्यांच्यात झालेले भांडण व्यवस्थित निपटून नेतात. अशा परिस्थितीत सासू वारंवार नवरा बायको मध्ये अडथळा आणत असेल तर सुनेला राग येतो.
विशेषत: जेव्हा सासू नेहमीच आपल्या मुलाला योग्य आणि सूनेला नेहमीच चुकीचे ठरवत असते. बर्याच सासू प्रत्येक परिस्थितीत आपल्या मुलाची बाजू घेताना दिसतात. सासू या दोघांमध्ये हस्तक्षेप करते आणि बर्याच वेळा निराकरण करण्यापेक्षा प्रकरण अधिक गुंतागुंतीचे करून ठेवते.
मुले आणि कुटूंबाशी संबंधित निर्णय :सासू आणि सून यांच्या विचारात जमीन आणि आकाशाचां फरक असतो. अशा बोटावर मोजण्याइतक्या सासू सूना असतील ज्या दोघींचे विचार एकसारखे जुळतात. हेच कारण आहे की जेव्हा सासू कुटुंबातील किंवा मुलांशी संबंधित निर्णय घेते तेव्हा सूनेला सासूचे विचार आणि घेतलेले निर्णय खटकतात. सुनेला ते अजिबात आवडत नाही. सासूला पूर्ण कुटुंबाची काळजी असते तर सुनेला फक्त स्वतःच कुटुंब चालवायला आवडते. सासूच्या या प्रकरणात निव्वळ भांडणेच होत असतात.
नोकरी आणि घरकाम :सुनेने कोणत्या प्रकारचा जॉब करायला हवा, घरी कधी यायला पाहिजे, घरातील कोणते काम कधी आणि कसे करायचे,या सर्व गोष्टींमध्ये सासू निरखून लक्ष ठेवत असते. आणि सुनेला सासूचा हाच हस्तक्षेप खटकतो. सुनेला सर्व कामे तीच्या हिशोबाने करायला आवडतात.
पगाराचा हिशेब :सासूला आपल्या मुलाचे उत्पन्न बघून घरातील खर्च नियंत्रित करावा अशी इच्छा असते, तर सून आपल्या पतीच्या पगाराची रक्कम तिच्या हातात घ्यावी अशी इच्छा मनात धरून असते. सुनेला वाटते की पतीच्या पैशाचा खर्च स्वतःच्या हिशोबाने करायला मिळाला पाहिजे. या युगातील सासू सुनेचे हे घरातील एक मोठे युद्ध चालू असते.