जितेंद्र यांनी ‘या’ अभिनेत्रीसोबत लग्न करण्यासाठी केली होती पूर्ण तयारी, मात्र ‘ऐनवेळी’ झाले असे की…..

जितेंद्र यांनी ‘या’ अभिनेत्रीसोबत लग्न करण्यासाठी केली होती पूर्ण तयारी, मात्र ‘ऐनवेळी’ झाले असे की…..

भारतीय चित्रपट सृष्टीने अनेक बॉलिवूड स्टार्सच्या रूपामध्ये जणू काही लखलखीत तारे चाहत्यांना दिले आहेत. भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास हा खूप व्यापक असा आहे. या इतिहासामध्ये आपल्या अप्रतिम अभिनय, नृत्य इत्यादींमुळे अनेक चित्रपट ताऱ्यांनी भरीव असे योगदान दिले आहे. अशाच लखलखीत ता-यांपैकी एक तारा म्हणजेच आपल्या नृत्यासाठी विशेष प्रसिद्ध असलेले एव्हरग्रीन जितेंद्र होय.

या महान अभिनेत्याचा चित्रपट सृष्टी मध्ये नेहमीच आदराने उल्लेख केला जातो. जितेंद्र यांचा आज वाढदिवस आहे. जितेंद्र ज्यावेळी चित्रपटसृष्टीमध्ये सक्रीय होते त्यावेळी त्यांच्या चित्रपटांतील भूमिकांप्रमाणेच वैयक्तिक आयुष्यातील घटनांमुळे सुद्धा ते नेहमीच प्रकाशझोतामध्ये असत. अनेक तरुणी त्यांच्या चाहत्या होत्या व त्यांच्यावर अगदी वेड्या प्रमाणे प्रेम करत असत.

मात्र याच सुखी वैवाहिक आयुष्यामध्ये नाते सुरू होण्याअगोदरच एक मोठे वादळ ड्रीम गर्ल हेमामालिनी यांच्या रुपाने आले होते .जितेंद्र हे शोभा कपूर यांच्यासोबत वाड्.निश्चय केल्यानंतर हेमामालिनी यांच्याकडे आकर्षित झाले होते व त्यांना हेमामालिनी यांच्यासोबत विवाहसुद्धा करायचा होता.

त्यावेळी हेमामालिनी यांच्या सोबत विवाह करण्यासाठी ते शोभा कपूर यांच्या सोबतचे नाते सुद्धा सोडायला राजी होते. यामुळे शोभा कपूर आणि जितेंद्र यांच्यामध्ये तणाव सुद्धा निर्माण झाला होता. या सर्व घटनांचा उल्लेख हेमामालिनी यांनी स्वतः लिहिलेल्या हेमा मालिनीःबियाँड द ड्रिमगर्ल या पुस्तकामध्ये सविस्तर केला आहे.

मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रेमसंबंधा बद्दल हेमामालिनी यांनी कुठेही वाच्यता केलेली नव्हती मात्र याची कल्पना त्यांच्या मातोश्री जया चक्रवर्ती यांना आली व त्यांना हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचा विवाह होऊ नये असे वाटत होते .हेमा मालिनी यांच्यासाठी जितेंद्र हे अतिशय उत्तम जोडीदार आहेत असे जया चक्रवर्ती यांना वाटत होते म्हणूनच त्यांनी जितेंद्र आणि हेमामालिनी यांच्या विवाहाची तयारी सुरू केली. हेमा मालिनी आणि जितेंद्र यांना त्या चेन्नईला घेऊन गेल्या जिथे या दोघांचा विवाह संपन्न होणार होता. ही गोष्ट कळताच शोभा कपूर आणि धर्मेंद्र हे तातडीने चेन्नईला गेले.

तिथे गेल्यावर धर्मेंद्र यांचा हेमामालिनी यांच्या वडिलांनी प्रचंड अपमान केला .मात्र धर्मेंद्र यांनी विनवण्या करून एका रूम मध्ये हेमामालिनी यांच्यासोबत बोलण्याची परवानगी मागितली व त्यावेळी त्यांनी हेमा मालिनी यांना जितेंद्र यांच्यासोबत विवाह करू नये असे सांगितले.

हे सगळे संभाषण चालु असताना जितेंद्र आणि त्यांचे पालक सर्व  या रूमच्या बाहेर उभे होते.बाहेर आल्यानंतर हेमामालिनी यांनी जितेंद्र आणि त्यांचे लग्न काही काळानंतर केले जावे असे सांगितले. हा प्रस्ताव जितेंद्र यांना अत्यंत अपमानास्पद वाटला व त्यानंतर ते तडक तिथून निघून गेले.

काही काळानंतर शोभा कपूर यांच्यासोबत जितेंद्र यांनी विवाह केला आणि धर्मेंद्र-हेमा मालिनी यांनीसुद्धा काही काळानंतर घरच्यांना राजी करून लग्नाची गाठ बांधली. निरनिराळ्या अडचणींना तोंड देऊन विवाह बंधनात अडकलेल्या जितेंद्र आणि शोभा कपूर यांनी त्यानंतर अत्यंत नेटाने आपला संसार केला. जितेंद्र यांनी आपल्या व्यावसायिक आयुष्यामध्ये सुद्धा अनेक यशस्वी चित्रपट केले यामध्ये हमजोली, संजोग,तोहफा,हिम्मतवाला यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.