फिल्मी दुनियेत, घराणेशाही बद्धल जॉनी लीव्हरची मुलीगी ‘जेमी’ बोलून गेली असे काही की, उडाली सगळ्यांची तारांबळ….

फिल्मी दुनियेत, घराणेशाही बद्धल जॉनी लीव्हरची मुलीगी ‘जेमी’ बोलून गेली असे काही की, उडाली सगळ्यांची तारांबळ….

आपण सध्या बघतच आहोत की फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय चालू आहेत नी कोण कोण कुणावर काय काय आरोप करत आहेत ते. त्यापैकी घराणेशाही ह्या मुद्यावर आज काल बरेच जन बोलत आहेत व यापूर्वी देखील बोलत आलेले आहेत. परंतु पूर्वी पेक्षा सध्या जे कोणी ह्या मुद्यावर बोलत आहेत ते अगदी निडर पणे बिनधास्त आणि कुणालाही न घाबरता बोलत आहेत.

सर्वांचे चाहता अभिनेता सुशांत याचे निधनानंतर ह्या विषयावर आगीची ठिणगी पडून एकच भडका उडाला आहेत. काही निर्माते आणि दिग्दर्शक यांचेवर असे आरोप आहेत की, येथे सध्या फक्त घराणेशाही हुकूमत करत असून काही ठराविक सेलिब्रिटींच्या च मुलांना आणि मुलींना प्रथम प्राधान्य दिलं जात. परंतु यापैकी काही स्टार किड्स मात्र याला अपवाद आहेत. आणि त्यांचं स्वतःच मत यापेक्षा जरा वेगळच आहेत.

स्वत: एक स्टार किड असल्याने तिचे स्वतःचे असे मत आहे की सर्व स्टार किड्स जन्म घेताच स्टार्स बनत बनत नसून असे वर्गीकरण करणे चुकीचे आहेत. कारण बरीच लोक बॉलिवूडमध्ये स्वत: च्या हिमतीवर आणि स्वत: च्या प्रतिभेमुळे टिकून राहत आहेत. ते म्हणतात की पक्षपात आणि भेदभाव हा बॉलिवूडमधील कीवर्ड नाहीये.

मीडियाशी बोलताना जेमी म्हणाली की माझे स्वतःचे असे मत आहे की प्रत्येकाचा स्वतःचा वेगळा वेगळा असा मार्ग असतो आणि प्रत्येक जण आपले आपले मार्गाने प्रवास करत असतो. आणि मी कुणाशी ही तुलना करत नाही. प्रत्येकाचा स्वतःचा संघर्ष असतो. ती म्हणते की मी स्वत: एक स्टार किड आहे, परंतु याचा अर्थ असा होत नाही की जे बॉलीवूड नेपोटिझमबद्दल बोलत आहेत त्यात सर्व स्टार किड्सना गृहीत धरले गेले पाहिजे.

कारण बर्‍याच अशा स्टार किड्स आहेत ज्यांना स्टार किडचे हवे असणारे विशेषाधिकार नाही अथवा तितके स्वातंत्र्य नाही. ती पुढे असेही म्हणते की माझ्या प्रवासात ही गोष्टदेखील लागू होत नाही कारण मी जिथे आहे तिथे पक्षपात नाही, भेदभाव नाही, तिथं काही खास अशी लोक आहेत की फक्त त्याच लोकांचां पक्षपात तिथे चालतो आहे. जेमी पुढे असे म्हणाले की तीने कधीही वडिलांचे नाव ऑडिशनसाठी वापरले नाही. ती म्हणाली की फादर जॉनीने तिच्यासाठी कुणालाही कधीही फोन केला नाही.

वडील जॉनी लीव्हरची काम करण्याची क्षमता आणि फिल्म इंडस्ट्रीमधील त्यांचा दर्जा याबद्दल बोलताना जेमी म्हणते की माझ्या वडिलांनी त्यांचे काम हे फक्त काम म्हणूनच केले, त्यानी त्या कामास आपले जीवन बनवले नाही. ते कामावर गेले, तिथं काम केले, चित्रपटाच्या शूटिंग केल्या आणि परत घरी आले असा होता त्यांचा दिनक्रम, जे त्याचे वास्तविक जीवन होते.

त्यांचे वास्तविक जीवन जे त्यांचे कुटुंब होते, मित्रपरिवार होता, त्यांचे अध्यात्म होते. आम्ही कोणत्याही चित्रपट पार्टीत कधीच भाग घेत नव्हतो, आम्ही कधी गेलो देखील नाही, आम्ही कधी कुठल्याही गटाचा भाग नव्हतो. माझे वडील कधीच फिल्मी नव्हते, मी म्हटल्याप्रमाणे, माझी आई अगदी नम्र पार्श्वभूमी व घरंदाज फॅमिली मधून आलेली आहेत.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *