ना मतभेद, ना वाद तरीही पतीपासून 25 वर्षे वेगळ्या राहिल्या अलका याज्ञिक; काय होत त्यामागील कारण? जाणून घ्या…

ना मतभेद, ना वाद तरीही पतीपासून 25 वर्षे वेगळ्या राहिल्या अलका याज्ञिक; काय होत त्यामागील कारण? जाणून घ्या…

1980-90 च्या सर्वात लोकप्रिय गायिक म्हणजे अलका याज्ञिक. त्यावेळी बॉलिवूडच्या लोकप्रिय पार्श्वगायिका होत्या. कोलकात्यामध्ये जन्मलेल्या अलका याज्ञिक यांनी वयाच्या 6 व्या वर्षापासून शास्त्रीय गायनाचे धडे घ्यायला सुरूवात केली. 1972 पासून त्या आकाशवाणीच्या कोलकाता केंद्रासाठी भजने गात.

वयाच्या दहाव्या वर्षी मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर अलका याज्ञिक यांना पहिला ब्रेक मिळाला तो वयाच्या 14 व्या वर्षीच आणि यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. दरम्यान, एका भेटीत राज कपूर यांना अलका यांचा आवाज अतिशय आवडला. त्यांनी अलकांची लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत भेट घालून दिली. यानंतर १९८० मध्ये ‘पायल की झंकार’ या चित्रपटात पार्श्वगायिका म्हणून गाण्याची संधी अलका यांना मिळाली. यावेळी त्या केवळ 14 वर्षांच्या होत्या.

अलका अनेक वर्षांपासून पती नीरज कपूर यांच्यापासून वेगळ्या राहतात. पण वेगळे राहूनदेखील त्यांचे नाते आणि प्रेम टिकून आहे. दोघांची एक मुलगी असून सायशा तिचे नाव आहे. सायशा अलकासोबत राहते.

होय, नीरज व अलका दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रातील. अलका बॉलिवूडच्या दिग्गज गायिका तर नीरज बिझनेसमॅन. साहजिकच लग्नानंतर अलका मुंबईत राहायच्या तर नीरज हे त्यांच्या बिझनेसमुळे शिलाँगमध्ये राहायचे. अलका कामातून जसा वेळ मिळेल तशा शिलाँग जात असत, तर कधी कधी नीरज मुंबईत येत. अनेक वर्षे हा ‘सिलसिला’ चालला.

यादरम्यान त्यांच्या मुलीचा जन्म झाला. मुलीच्या जन्मानंतर नीरज यांनी मुंबईला शिफ्ट होण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना बिझनेसमध्ये मोठा तोटा झाला. अखेर अलका यांनीच पतीला शिलाँगमध्ये परतून आपल्या बिझनेसवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आणि पुन्हा ‘लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिप’ दोघांच्याही वाट्याला आले. तेव्हापासून नीरज व अलका वेगवेगळे राहतात. अर्थात त्यांच्यात एक वेगळे बॉन्डिंग आहे. प्रेम आजही कायम आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *