..म्हणून काजोलची मुलं तिचे चित्रपट कधीच पाहत नाहीत…’हे’ आहे त्यामागील करण

..म्हणून काजोलची मुलं तिचे चित्रपट कधीच पाहत नाहीत…’हे’ आहे त्यामागील करण

1992 मध्ये आलेला आपण बेखुदी हा चित्रपट पाहिला की नाही ते माहीत नाही. मात्र, या चित्रपटातून अभिनेत्री काजोल हिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. हा चित्रपट काही खास कमाल बॉक्स ऑफिसवर करू शकला नव्हता.

त्यानंतरच्या पुढच्याच वर्षी म्हणजे 1993 मध्ये अब्बास मस्तान यांचा बाजीगर हा चित्रपट रुपेरी पडद्यावर आला आणि या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला. यातील शाहरुख खानचा अभिनय सर्वांनाच खूप आवडला. यातील शिल्पा शेट्टीच्या भूमिकेचे देखील खूप कौतुक झाले. मात्र, या सगळ्यांमध्ये भाव खाऊन गेली होती ती काजोल.

2020 मधील सर्वाधिक चाललेला हा चित्रपट म्हणावा लागेल. लग्नानंतर अजय आणि काजोल यांना दोन मुले झाली. मुलीचे नाव न्यासा देवगन तर मुलाचे नाव युग देवगण असे आहे. नुकताच एक किस्सा समोर आला आहे.

एका मुलाखतीत काजोलने सांगितले की, माझी मुलं माझा चित्रपट अजिबात पाहत नाही त. तिने कारण सांगितले ते एकूण सर्वांनाच आश्चर्य वाटले.

काजोल या मुलाखतीत म्हणाली, मी आजवर अनेक चित्रपट केले आहेत. माझे लाखो फॅन आहेत. तसेच मी गेल्या 25 वर्षांपासून बॉलीवूडमध्ये कार्यरत आहे. मला अनेक जण फॉलो करतात. मात्र, माझी मुलं माझा चित्रपट काही पाहत नाहीत. यावर सर्वांनाच आश्चर्य वाटले.

पुढे ती म्हणाली, माझी मुलं इतर अभिनेता अभिनेत्रींचे चित्रपट पाहतात. मात्र, माझा चित्रपट पाहण्याची वेळ आली की ते अजिबात पाहत नाहीत. त्यांना मी अनेकदा याबाबत विचारणा केली. मात्र, ते काहीही सांगायला तयार नव्हते. एक दिवस मी त्यांना याबाबत विचारणा केली, त्यावर त्यांनी असे उत्तर दिले की मीही अवाक झाले.

काय म्हणाली मुलं…

आपली आई म्हणजे काजोलचे चित्रपट पाहण्याबाबत दोन्ही मुलं म्हणाली की, आम्हाला आईचे चित्रपट पाहायला आवडतात. मात्र, अनेक चित्रपटांमध्ये आई ही रडण्याचा सीन करते. त्यामुळे आम्हालाही रडू येते.

या कारणामुळेच आम्हाला तिचे चित्रपट पहावे वाटत नाहीत. आमची आई खूप चांगला अभिनय करते. आम्हाला तुमचा खुप अभिमान आहे. मात्र, या एकाच कारणामुळे आम्ही तिचे चित्रपट पाहत नसल्याचे त्यांनी सांगितले. यावर काजूला देखील खूप गहिवरून आले.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *