करीना कपूरने घातले १८ कॅरेटचे रोज गोल्डचे घड्याळ, किंमत ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

करीना कपूरने घातले १८ कॅरेटचे रोज गोल्डचे घड्याळ, किंमत ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

सेलेब्रिटी म्हटलं की त्यांना फॉलो करणारे त्यांचे लाखो चाहते असतात. त्यांच्या आवडीनिवडी ते काय करतात कसे जीवन जगतात, ते परिधान करतात त्या वस्तूंची किंमत किती असते? असा विचार आपण अनेकवेळा करत असतो. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान इंडस्ट्रीमधील स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे.

आपल्या जबरदस्त अभिनयासोबत ती आपल्या स्टाईलने आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करते. तिला बॉलिवूडची स्टायलिश मम्मी बोलणे चुकीचे ठरणार नाही. एअऱपोर्टपासून ते रेड कार्पेट आणि जिमपर्यंत करीना नेहमीच परफेक्ट लूकमध्ये दिसते. ती आपल्या फॅशन सेन्सने फॅन्सना कधीही निराश करत नाही. आऊटफिट्ससोबत करीनाला दागिने घालायलाही आवडतात.

२७ लाखाहून अधिक आहे किंमत

या घड्याळाची किंमत २७,१०,००० रूपये इतकी आहे. Serpenti च्या अधिकृत वेबसाईटवर याची किंमत देण्यात आली आहे. यासोबतच यात डबल स्पायलल वॉच १८ कॅरेट रोज गोल्डसोबत ब्रिलियंट कट डायमंडपासून बनवण्यात आले आहे.

अनेक अभिनेत्रींनी घातले आहे हे घड्याळ

करीना शिवाय ट्विंकल खन्ना आणि शिल्पा शेट्टीसारख्या अभिनेत्रींनीही हे घड्याळ घातले आहे. या अभिनेत्रींची ही आवडती अक्सेसरीज आहे. हे घड्याळ कॅज्युअल आणि पार्टी या दोन्ही लुक्ससोबत कॅरी करता येते.

सिंगल स्ट्रॅप वॉचही आहे पॉप्युलर

डबल स्ट्रॅपशिवाय सिंगल स्ट्रॅप वॉचही खूप पॉप्युलर आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी आणि बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान यांनी सिंगल स्ट्रॅप घड्याळ घातले होते. याची किंमत तब्बल ६ लाख रूपये आहे.

कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास करीना मार्चमध्ये रिलीज झालेल्या इंग्रजी मीडियम या सिनेमात दिसली होती. यात ती पहिल्यांदा इरफान खानसोबत दिसली होती. याशिवाय ती आता लाल सिंग चढ्ढामध्येही दिसणार आहे. यात ती आमिर खानसोबत काम करणार आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *