७४ वर्षीय कबीर बेदी ह्यांनी २९ वर्ष लहान मुलीसोबत केले आहे चौथे लग्न, अशी आहे त्यांची प्रेम कहाणी….!

प्रत्येक सिनेमात जेवढे महत्त्व नायकाचे असते तेवढेच खलनायकचे सुद्धा महत्वाचे असते. खलनायक जर नायकाच्या तोडीस असेल, तरच तो सिनेमा हिट होतो. ८० ते ९० दशकातील सिनेमे तुम्ही पाहिले असतील, तर एक नाव नक्कीच खलनायक म्हणून आजही तुमच्या लक्षात असेल ते नाव आहे कबीर बेदी. आपल्या अभिनयाने अनेक सिनेमे त्यांनी एका हातावर पेलले आहेत. त्यांचा दमदार आवाज त्यांच्या अभिनयाला जोड होता. म्हणून जुन्या खलनायकापैकी कबीर बेदी हे दिग्गज नाव मानले जाते.
पण कबीर बेदी आपल्या अभिनयापेक्षा अभिनेत्रींसोबत रिलेशनशिपमुळे नेहमीच चर्चेत राहिले. ७४ वर्षीय जीवनात त्यांनी चार लग्न केली आहेत. ‘परवीन दुसांज’ ही त्यांची चौथी पत्नी आहे जी त्यांच्या वयापेक्षा २९ वर्षाने लहान आहे. तरीसुद्धा जगाचा विचार न करता आपले प्रेम त्यांनी सिद्ध करून विवाह केला.
सुरुवातीला दोघांची मैत्री झाली आणि नंतर याचे रूपांतर प्रेमात झाले. दरम्यान त्यांचे मैत्री प्रेम १० वर्षांपासून होतं. २०१६ मध्ये आपल्या वाढदिवसाच्या दिवशी कबीर बेदी आणि परवीन दुसांजने लग्न केलं. लग्नाच्या आधी हे दोघं लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.
पूजाने अनेक इंटरव्ह्यूमध्ये आपली नाराजगी व्यक्त सुद्धा केली आहे. लग्नाच्या वेळीस तिने केलेल्या ट्विटमूळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. ह्या ट्विटमध्ये परवीन हिला सर्व जगासमोर डायन असे संबोधले होते. कबीर बेदी ह्यांचे पाहिले लग्न नृत्यांगना प्रोतिमा बेदी सोबत झाले होते. ह्या पत्नीकडून त्यांना सिद्धार्थ बेदी आणि पूजा बेदी अशी दोन मुले आहेत. पण त्यांच्याच नातं खराब झाल्यामुळे ते वेगळे झाले.
ह्यानंतर सुसैन हम्फ्रेस ह्या ब्रिटिश फॅशन डिझायनर सोबत त्यांनी लग्न केलं. पण हे नातं ही फारकाळ टिकलं नाही. सुसैन सोबत घटस्फोटा नंतर १९९० रेडिओ प्रेझेंटर निकी सोबत लग्न केलं. पण २००५ मध्ये हे ही नाते संपुष्टात आलं. ह्यानंतर त्यांनी परवीन दुसांज सोबत चौथे लग्न केलं.