आमिर खानसोबत घ’टस्फो’ट घेतल्यामुळे मालामाल झाली किरण राव ; असणार इतक्या करोडोंची मालकीण…

आमिर खानसोबत घ’टस्फो’ट घेतल्यामुळे मालामाल झाली किरण राव ; असणार इतक्या करोडोंची मालकीण…

आमिर खानने पहिली पत्नी रिनासोबत काडीमोड घेऊन किरण रावसोबत लगीनकाठ बांधली होती. लगान सिनेमावेळी आमिर आणि किरण रावचं सुत जुळलं होतं. “गेल्या 15 वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर आम्ही घ’टस्फो’ट घेत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

आम्हाला आमच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात करायची आहे. त्यामध्ये आम्ही पती-पत्नी नव्हे तर पालक आणि एकमेकांसाठी कुटुंबातील एक सदस्य असू,” असे या निवेदनात म्हटले आहे. आमिर खान आणि किरण राव यांच्या घ’टस्फो’टामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, किरण राव यांची एकूण मालमत्ता सुमारे 20 मिलिअन डॉलर्स म्हणजेच जवळपास 146 करोड इतकी आहे. किरण एक सर्वाधिक कमाई करणारी महिला दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहे. आमिर खानने त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार अभिनेत्याची एकूण मालमत्ता सुमारे 1434 कोटी रुपये आहे. एका चित्रपटासाठी तो तब्बल 85 कोटी रुपये आकारतो.

स्वतःची संपत्ती
किरणकडे स्वतःचे आलिशान घर आणि महागड्या गाड्या आहेत. मात्र, आपल्याकडे किती घर आहेत आणि किती वाहने आहेत, हे किरणने अद्याप कुठेही जाहीर केलेले नाही. मीडिया रिपोर्टननुसार 2020मध्ये किरणची एकूण संपत्ती 20 दशलक्ष म्हणजेच 146 कोटी इतकी होती.

किरणची कारकीर्द
2005मध्ये आमिर खान आणि किरण राव यांचे लग्न झाले. आता या दोघांनाही एक मुलगा देखील आहे, ज्याचे नाव आझाद आहे. किरणच्या कामाविषयी बोलायचे तर ती एक निर्माती, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक आहे. तिने ‘जाने तू… या जाने ना’, ‘धोबी घाट’, ‘दंगल’, ‘तलाश’, ‘सिक्रेट सुपरस्टार’, ‘पिपली लाइव्ह’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. यासह तिने ‘धोबी घाट’चे दिग्दर्शनही केले आहे. किरण ही बॉलिवूड स्टार्स वाईफमधील सर्वात यशस्वी महिला आहे.

सुखी संसार सुरु असताना अचानक दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय का घातला हे अजूनही कुणाला समजू शकले नाही. एक आदर्श कपल म्हणून या जोडीकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन होता. पण अचानक दोघांनी घटस्फोट घेतल्यामुळे त्यांचा चाहत्यांना धक्का बसला आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.