IPL 2022: एक वर्षासाठी बॅन होणार केएल राहुल आणि रशीद खान? दोघांकडून झाली ‘ही’ एक चूक..

IPL 2022: एक वर्षासाठी बॅन होणार केएल राहुल आणि रशीद खान? दोघांकडून झाली ‘ही’ एक चूक..

सध्या सगळीकडेच आयपीएलची चर्चा पुन्हा एकदा जोराने सुरु झाली आहे. येत्या आयपीएलच्या सामन्यांमध्ये दोन नवीन संघ समाविष्ट करण्यात आले आहेत. साहजिकच त्यांना देखील चांगल्या आणि आवडत्या खेळाडूंना निवडण्याची संधी मिळायला हवी. सोबतच, जुन्या संघाना देखील त्यांच्या आवडीचे खेळाडू स्वतःच्या संघामध्ये हवे असणारच.

अश्या परिस्थितीमध्ये, जुन्या संघाना आपल्या आवडत्या कोणत्याही ४ खेळाडूंना रिटेन करण्याची अनुमती देण्यात आली आहे. तेव्हा सर्वच आयपीएलचे संघ आपल्या आवडत्या खेळाडूना रिटेन करण्यासाठी चांगलीच कसरत असल्याचे पाहायला मिळत आहे. समाविष्ट झालेल्या नवीन दोन संघामुळे, आता पूर्वीच्या आयपीएलच्या संघामध्ये चांगलंच बदल झाल्याचे बघायला मिळणार हे नक्की.

एका संघासोबत बांधील असताना इतर कोणत्याही संघासोबत, कोणत्याही प्रकारचा व्यवहार किंवा चर्चा करताना खेळाडू आढळून आला तर तो मोठा नियम उल्लंघन आणि गु’न्हा ग्राह्य धरण्यात येतो. असच काही, रवींद्र जडेजा सोबत देखील झाले होते. २०१० मध्ये रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्स कडून खेळत होता आणि त्यांच्यासोबतच्या करारामध्ये होता.

असे असले तरीही त्याने इतर संघासोबत चर्चा आणि काही करार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याला आयपीएल मधून एक वर्षांसाठी बॅन करण्यात आले होते. आणि हीच चूक केएल राहुल आणि रशीद खान कडून झाली असण्याची शक्यता आहे. लखनऊच्या संघाने येण्यापूर्वीच आयपीएलच्या क्रिकेट वर्तुळात जोरदार खळबळ उडवली आहे.

सांगण्यात येत आहे की, त्या संघाकडून के एल राहुल ला २० को’टी रु’पये आणि संघाचा कॅप्टन बनवण्याची ऑफर देण्यात आली आहे. यंदाच्या मोसमात, राहुलच्या बॅटने जोरदार प्रदर्शन दिले होते. ६०० हुन अधिक धावा के एल राहुलने बनवल्या होत्या, त्यामुळे साहजिकच त्याला आपल्या संघात घेण्यासाठी संघांमध्ये चढाओढ लागली आहे.

त्याचबरोबर रशीद खान एक उत्तम गोलंदाज आहे. त्याच्या गोलंदाजीसमोर भलेभले फलंदाज शांत होतात. त्याला देखील आपल्या संघामध्ये घेण्यासाठी लखनऊची टीम चांगलाच जोर लावत आहे. १६ कोटी रुपयांची ऑफर रशीद खानला देण्यात आली आहे तर सनरायजर्स कडून त्याला १२ ते १४ कोटींची ऑफर आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार,के एल राहुल आणि रशीद खान या दोघानी लखनऊच्या टीमसोबत चर्चा केली आहे.

याबद्दल पूर्ण त’पास करण्यात येणार असल्याच त्यांनी सांगितलं आहे. यामध्ये दोन्ही खेळाडू आणि संघ कोणीही दोषी आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल असं देखील बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता, येत्या आयपीएलच्या मोसमात के एल राहुल आणि रशीद खान खेळतील कि नाही यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.