‘कोंबड्यांमध्ये’ खरंच ‘कोरोना विषाणू’ आहे का? मांसाहार करणाऱ्यांनी नक्की वाचा हा लेख…

कोरोना व्हायरसमूळे चीनसह अनेक देशांमध्ये हाहाकार माजला आहे या व्हायरसमुळे हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या व्हायरसचा 29 संशयित रुग्ण भारतातही आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर हा आजार नेमका कशामुळे होतो याचा शोध सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.
सोशल मीडियावर असा एक मॅसेज पसरत आहे की कोरान व्हायरस ची लागण मांसाहार केल्यामुळे होत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून मांसाहार करणाऱ्यांमध्ये मात्र गोंधळ निर्माण झाला आहे, यामुळे चिकन व्यवसायावर मोठा परिणाम झाल्यामुळे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे.
सोशल मीडियावर अशी माहिती पसरवली जात आहे की चिकन खाण्यातून कोरानो विषाणूची लागण होते आहे. पण डॉक्टरांनी असा दावा केला आहे की ही माहिती सपशेल चुकीची आहे. आणि चिकन खाण्यातून कोरानो विषाणूची लागण होत नाही.
सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात असल्यामुळे बऱ्याच डॉक्टरांनी असा दावा केला आहे की कोंबड्यांमध्ये कोरनो विषाणू आढळून आला ही अफवा आहे. यावर विश्वास ठेवू नये कारण कोंबड्यांमध्ये फक्त ब्रँड फ्ल्यू विषाणू असतो पण तो सुद्धा सुद्धा आपल्या परिसरात नाही.
कोरानो विषाणू काय आहे?
कोरोना हा विषाणूंचा एक मोठा समूह आहे जो प्राण्यांमध्ये आढळतो. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीएस) च्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणू जनावरांमधून मानवापर्यंत पोहोचतो. नवीन चिनी कोरोनो व्हायरस सारस विषाणूसारखा आहे.
कोरानो विषाणूच्या संसर्गामुळे ताप, सर्दी, श्वास घेण्यात अडथळा येणे, नाक वाहणे, घसा खोकला यासारख्या समस्या उद्भवतात. यामुळे निमोनिया देखील होऊ शकतो. त्याची स्थिती मध्य-पूर्व श्वसन सिंड्रोम (एमईआरएस) आणि सेव्हल तीव्र श्वसन सिंड्रोम (एसएआरएस) सारखीच आहे.
यापूर्वी हा विषाणू डीकोड करणार्या हॉंगकॉंग युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या व्हायरोलॉजिस्ट लिओ पून यांना वाटले होते की हा विषाणू प्राण्यांमधून फक्त प्राण्यांमध्ये पसरतो. पण आता हा विषाणू माणसांमधून पसरत आहेत.
याचा प्रसार कसा होतो?
डब्ल्यूएचओच्या मते कोरोना व्हायरस (सीओव्ही) एक झुनोटिक आहे. याचा अर्थ असा की तो 2019-एनसीओव्हीद्वारे प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरला आहे. असे मानले जाते की 2019-एनसीओव्ही सीफूड खाऊन पसरला होता. पण आता कोरोना विषाणू माणसापासून माणसापर्यंत पसरत आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या एखाद्या व्यक्तीशी संपर्क आल्यामुळे हा विष्णू पसरू शकते. खोकला, शिंकणे किंवा हात मिळवणे यामुळे यामुळे देखील या विषाणूचे संक्रमण होऊ शकते.