लग्नापूर्वीच ‘ही’ अभिनेत्री देणार बाळाला जन्म, पतीला म्हणाली बाळ आल्यानंतर मारू 7 फेरे, नाव वाचून दंग व्हाल

लग्नापूर्वीच ‘ही’ अभिनेत्री देणार बाळाला जन्म, पतीला म्हणाली बाळ आल्यानंतर मारू 7 फेरे, नाव वाचून दंग व्हाल

बॉलीवूड किंवा टेलिव्हिजनवर पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रींना त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार जपावे लागते, असे चित्र आजवर आपण पाहिले असेल. हे चित्र फार पूर्वीच्या काळापासून असेच सुरू आहे. एखाद्या अभिनेत्रीचे लग्न झाले आहे, असे समजले की तिचा चित्रपटाचा कल बदलून जातो. तसेच चित्रपट कमी प्रमाणात मिळतात.

पूर्वीच्या काळात लग्न झालेली अभिनेत्री असेल तर त्या चित्रपटाला अतिशय कमी प्रमाणात गर्दी होत असे. मात्र, कालांतराने हा ट्रेंड बदलला आहे. तसेच जर एखाद्या अभिनेत्रीला मुलगा झालेला असल्याचे प्रेक्षकांना समजले तर चित्रपटाकडे फिरकत नव्हते. मात्र, कालानुरूप हा कल प्रेक्षकांनीही स्वीकारलेला आहे. पण त्यात काही अभिनेत्र्या लग्नाआधीच गर्भवती राहिल्या होत्या. म्हणून आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत. जी बाळाला जन्म दिल्यानंतर लग्न करणार आहे.

पहिल्या मुलाविषयी बोलताना पूजा एका इंटरव्यू मध्ये असे म्हणते की, कुणाल आणि मी दोघेजण एका नव्या फेजमध्ये जाण्यासाठी खूपच उत्सुक आहोत. मी खूपच उत्सुक आहे आणि माझा पर्सनल टाईप खूपच एन्जोय करत आहे. त्यामुळे मी खूप दिवसाची घराच्या बाहेर देखील पडले नाही.

पूजाने आपल्या पारंपारिक लग्नाविषयी सांगताना असे म्हटले की आम्ही लग्नासाठी खूप काही विचार केला होता. आम्हाला लग्न खूपच धामधुमीत करायचे होते. याविषयी आम्ही अगोदर पासूनच खूप काही प्लॅन करून बसलो होतो.

परंतु या कोरोनाच्या महामारी मुळे संपूर्ण जगाला घरातच बसावे लागले. त्यामुळे आमचे लग्न देखील होऊ शकले नाही. त्यामुळे आम्हाला कोर्ट मॅरेज करावे लागले आणि आम्ही पाहिलेल्या मोठ्या लग्नाचे स्वप्न देखील तुटले.

पूजाने लग्नाविषयी पुढे सांगताना असे म्हटले की आम्ही आमचे स्वप्न परत एकदा साकार करणार आहोत. जेव्हा आम्ही आमच्या पहिल्या मुलाला जन्म देऊ त्यानंतर आम्ही आमचे लग्न परत एकदा धामधुमीत साजरे करणार आहोत. कुणाल आणि पूजा 15 एप्रिल ला लग्न करणार होते. कोरोनामुळे झालेल्या या लॉकडाऊन मुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही. त्यानंतर दोघांनी आपल्या लग्नासाठी जमवलेले पैसे गरीबांमध्ये वाटले.

‘देवो के देव महादेव’ या सिरीयल द्वारे लोकप्रिय झालेल्या पूजाने या सिरीयल मध्ये पार्वतीचे पात्र निभावले होते. पूजाने 2008 साली आलेल्या ‘कहानी हमारे महाभारत की’ या सिरीयल पासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तसेच आणखी एक सिरीयल म्हणजेच ‘तुझ संग प्रीत लगाई सजना’ यामध्ये देखील पूजा झळकली आहे. पूजाची या सेटवर कोस्टार असलेल्या कुणाल वर्मा शी मैत्री झाली आणि या मैत्रीचा पुढे प्रेमात रूपांतर होऊन दोघांनी कोर्ट मॅरेज केले.

2017 मध्ये पूजाने कुणाल सोबत सगाई चा कार्यक्रम पार पाडला होता. अंधेरीच्या ‘द क्लब’मध्ये दोघांची प्रायव्हेट एंगेजमेंट झाली होती. यामध्ये पूजाने पिंक आणि गुलाबी कलरचा लहंगा घातला होता. तसेच राजस्थानी दागिने घातले होते. कुणाल ब्लॅक कलरच्या वेलवेट शेरवानी मध्ये समोर आला होता.

पूजा बॅनर्जी ने ‘सर्वगुण सम्पन्न’, कयामत, देवों के देव महादेव, ‘क़ुबूल है’ आणि ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’ या सिरीयल मध्ये काम केलेले आहे. पूजा बिग बॉस बंगला मध्ये देखील एक स्पर्धक म्हणून गेली होती. पूजा ने सिरीयल सोबतच चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे ‘राजधानी’ आणि ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ हे बॉलीवूड चित्रपट तिने केले आहे. या सोबतच तेलुगू , बंगाली, नेपाळी या चित्रपटांमध्ये देखील ती दिसली होती.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.