लग्नाच्या 9 वर्षानंतर महिलेला समजलं की ती आहे ‘पुरुष’, नवऱ्याला ही बाब समजल्यावर जे झाले ते वाचून पायाखालची जमीन सरकेल.

पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील 30 वर्षीय विवाहित महिलेला अचानक पोटाच्या खाली तीव्र वेदना होऊ लागल्या त्यामुळे तिने तातळीने रुग्णालय गाठले. त्यानंतर रूग्णालयात तिची तपासणी केल्यानंतर ती महिला चक्क ‘पुरुष’ आढळून आल्याचे डॉक्टरांना समजले. त्याचबरोबर तिच्या अंडकोषात कर्करोग असल्याचे दिसून आले.
गेल्या 9 वर्षांपासून ही महिला आपले वैवाहिक जीवन आनंदाने जगत आहे पण काही महिन्यांपूर्वी अचानक पोटदुखीचा त्रास होऊ लागला. पोटदुखीची तक्रार घेऊन तिने शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस रुग्णालयात गेले गाठले. अनुपम दत्ता आणि डॉ. सौमन दास यांनी वैद्यकीय तपासणी केल्यावर महिलेची खरी ओळख उघडकीस आली.
ज्यामध्ये ती व्यक्ती अनुवांशिकदृष्ट्या पुरुष आहे परंतु तिच्या शरीरातील सर्व बाह्य अवयव महिलेचे आहेत. डॉक्टरांनी सांगितले की या महिलेची केमोथेरपी चालू आहे आणि तिची प्रकृती स्थिर आहे.
डॉक्टर पुढे म्हणाले, ‘ती एका स्त्री सारखी मोठी झाली आहे आणि पुरुषासोबत जवळजवळ 10 वर्षांपासून वैवाहिक जीवन जगत आहे. यावेळी, आम्ही रुग्ण आणि तिच्या पतीचा सल्ला घेत आहोत आणि आतापर्यंत जसे ते जगत आले आहेत तसेच पुढे देखील जगतील असे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहोत.
डॉक्टर म्हणाले की यापूर्वी रुग्णाच्या इतर दोन नातेवाईकांनाही अशीच समस्या होती, म्हणूनच ती आनुवंशिक संबंधित समस्या असल्याचे दिसते.