लॉकडाऊनमध्ये बिग बींसोबत घडलं असं काही, जे याआधी 78 वर्षांत कधीच झालं नाही

कोरोना महामारीमुळे जगभरात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक देश सध्या हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. मात्र, गेल्या दोन महिन्यापासून जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन पाळण्यात आला होता. भारतात देखील आता लॉकडाऊन काही प्रमाणात उठवण्यात आला आहे. असे असले तरी लोक काळजी घेताना दिसताहेत.
सरकारने देखील लोकांना आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना करून आपली प्रतिष्ठाने उघडण्यास काही प्रमाणात मुभा दिली आहे. मात्र, ज्या ठिकाणी पुन्हा गर्दी होईल त्या ठिकाणी लॉकडाऊन कडकपणे राबवण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अनेक बॉलीवूडचे अभिनेते देखील सध्या घरातच बसलेले आहेत.
अमिताभ बच्चन यांचे वय सध्या 78 वर्षांच्या जवळपास आहे. त्यामुळे ते कुठेही बाहेर फिरत नाहीत. घरच्या घरी व्यायाम करताना ते दिसतात. तसेच पुस्तक वाचनात देखील आपला वेळ ते घालवतात. उर्वरित वेळ नात आराध्यासोबत ते घालतात.
तसेच सून ऐश्वर्या रायसोबत देखील त्यांची विविध विषयावर चर्चा होत असते. अभिषेक देखील त्यांना काही गोष्टी सांगत असल्याचे सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून सांगितले होते की ‘दो दिन का ये मेला है, दो दिन का आना है जाना है, जीवन चलते जाना है’. या ट्विटवर देखील अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या.
हे केले काम..
लॉक डाऊनमुळे मी सध्या घरातच अडकून पडलो आहे. त्यामुळे मला काही चित्रीकरण किंवा इतर गोष्टी करता येत नसल्याचे आमिताभ यांनी सांगितले आहे. यावेळी अमिताभ बच्चन म्हणाले की, आपण आपल्या 78 वर्षांच्या करिअरमध्ये कधीही एवढा वेळ घरी राहिलो नव्हतो. 78 वर्षात आपण ज्या गोष्टी कधीही केल्या नाहीत त्या गोष्टी या दिवसांमध्ये आपण केल्या आहेत.
तसेच अनेक नव्या गोष्टी आपण शिकल्याचे ही त्यांनी म्हटले आहे. हा वेळ एकूणच खूपच सत्कारणी लागला आहे. देवाची कृपा म्हणून किंवा कोरोना प्रकोप म्हणून तब्बल दोन-तीन महिने आपण कुटुंबासोबत घातल्याचे देखील त्यांनी नमूद केले आहे.