‘लॉकडाऊन’मध्ये अडकलेला सलमान खान ‘या’ खास व्यक्तीला करतोय मिस, दिवसातून कित्येकदा करतो ‘व्हिडिओ’ कॉल.

कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड रोखण्यासाठी लाँकडाऊन ही एकमेव व प्रभावशाली उपाय योजना सध्या राबवणे शिवाय पर्याय नसल्याचे सर्वच देशांमधील तज्ञांच्या लक्षात आले आहेत.
म्हणूनच अद्यापही कोणताही ठाम असा उपाय न निघू शकलेल्या संकटाला रोखण्यासाठी लॉकडाऊनची मुदत भारतामध्ये 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आली आहे. अशा परिस्थितीमध्ये काहीजण आपल्या सर्व कुटुंबीयांसोबत घरामध्ये सुरक्षित आहेत.
बॉलीवूडच्या भाईजान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व कोरोनाच्या संकटांमध्ये जवळपास 16 हजार चित्रपट क्षेत्राशी निगडीत कामगारांच्या खात्यामध्ये पैसे जमा केलेल्या व या संकटामध्ये अडकून बसलेल्या गरजूंना मदत करणाऱ्या सलमान खानची परिस्थिती सुद्धा या क्षणाला काही वेगळी नाही.
सध्या सलमान पनवेल येथील त्याच्या फार्म हाऊसवर असून लाँकडाऊनमुळे तो दुसऱ्या जागी जाऊ शकत नाही व या काळामध्ये तो त्याच्या जवळच्या एका विशेष व्यक्तीला खूप मिस करतोय. त्याची विचारपूस करण्यासाठी दिवसातून कित्येकदा व्हिडिओ कॉल करतो. सलमान मिस करत असलेली ही व्यक्ती नक्की कोण हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना निश्चितच पडेल ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून सलमान खानचे वडील व प्रसिद्ध पटकथालेखक सलीम खान होय.
महाराष्ट्रामध्ये लाँकडाऊनची घोषणा होण्याच्या काही दिवस आगोदर सलमान खान आपला भाचा आहिल याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी कुटुंबियांसोबत पनवेल येथील फार्महाऊसवर आला होता. मात्र लाँकडाऊन जाहीर झाल्यानंतर त्याला या ठिकाणीच राहणे भाग पडले.
सध्या पनवेल येथील फार्महाऊसवर सलमान सोबत त्याचे काही नातेवाईक, कुटुंबीय आणि मित्रमंडळी आहेत. त्याची आईसुद्धा त्याच्यासोबत आहे मात्र त्याचे वडील सलीम खान हे मुंबई येथे एकटेच आहेत. लाँकडाऊनमुळे ते पनवेलला येऊ शकत नाहीत.
वडिलांसोबत मित्रासारखे नाते असलेल्या सलमानला लॉक डाऊनच्या या चिंताजनक परिस्थिती मध्ये वडिलांची काळजी सतावत आहे. त्याला वडिलांची प्रचंड आठवण सुद्धा येत आहे म्हणूनच तो दिवसातून कित्येकदा वडिलांना व्हिडिओ कॉल करतो व त्यांच्याशी गप्पा मारत असतो.
सलमान खान व त्याच्या सर्व कुटुंबीयांनी लॉक डाऊनमुळे ज्यांना रोजचे अन्नसुद्धा मिळू शकत नाही त्यांच्यासाठी अहोरात्र काम सुरू केले आहे. सध्या लाँकडाऊनमुळे सर्व चित्रीकरण व प्रमोशनचे कामेसुद्धा बंद आहेत.
अशावेळी जुनिअर आर्टिस्ट, चित्रपट क्षेत्राशी निगडित तंत्रज्ञ, कामगार यांच्या रोजगारावर गदा आलेली आहे. सलमान खान व सलीम खान यांनी या सर्व लोकांना खाण्याच्या पॅकेट पासून, सँनिटायझर व मास्कसुद्धा पुरवले आहेत.