माधुरीचा हा बोल्ड सीन पाहण्यासाठी सिनेमागृहाबाहेर लागायची रांग, किस सीन देताना अभिनेता झाला होता बेभान

नव्वदच्या दशकामध्ये अॅक्शन थ्रिलर चित्रपटाचा जमाना होता. त्यामुळे अशा पद्धतीचे चित्रपट या काळात खूप बनायचे. धर्मेंद्र यांनी पुनरागमन करताना असे भरपूर चित्रपट केले होते. त्यानंतर अनेक दिग्गज अभिनेते देखील ऍक्शन चित्रपटात काम करायचे. त्यावेळी फेरोज खान हे देखील खूप बहारात होते. फिरोज खान यांनी अनेक हिट चित्रपट दिले.
कुर्बानी चित्रपटात त्यांनी विनोद खन्ना यांच्यासोबत काम केले. त्यामुळे फिरोज खान यांच्याकडे निर्माते म्हणून देखील पाहिले जाते. त्यानंतर विनोद खन्ना आणि त्यांच्यामध्ये खूप चांगली मैत्री निर्माण झाली होती. त्यानंतर फिरोज खान यांना एक चित्रपट करायचा होता. मात्र, यात त्यांना अभिनेत्री मिळाली नव्हती.
चित्रपटात माधुरीची भूमिका फार गाजली होती. या चित्रपटाचे नाव होते दयावान..मात्र एका मुलाखतीमध्ये माधुरीने सांगितले की, हा चित्रपट करून आपण खूप पश्चाताप करत आहोत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तीन वर्षांनी त्यांनी मुलाखत दिली होती.
त्यात आपण असा चित्रपट का स्वीकारला याबाबत आपल्याला आजही पश्चाताप होत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर माधुरीने असा चित्रपट कधीही केला नाही. चित्रपटानंतर काही वर्ष या इमेज मधून बाहेर यायला माधुरी दीक्षितला लागले.
माधुरीचा किसिंग सीन पाहायला जायचे प्रेक्षक
नव्वदच्या दशकामध्ये विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांचा दयावान हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील कथाकनापेक्षा माधुरी आणि विनोद खन्ना यांच्या या किसिंग सीनची खूप चर्चा झाली होती. असे सांगतात की, हा किसिंग व इंटीमेट सीन देताना विनोद खन्ना एवढे बेभान झाले होते की, त्यांनी माधुरी दीक्षितला आपल्या बाहुपाशात जखडून ठेवले होते.
माधुरीने अक्षरशः ढकलून दिल्यानंतर हा सीन संपुष्टात आल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर माधुरीने विनोद खन्ना यांच्यावर खूप संताप केला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा आणि थिएटरबाहेर प्रेक्षकांच्या अक्षरशा रांगा लागल्या होत्या. चित्रपट पाहण्यापेक्षा लोक हा सीन पाहण्यासाठी केवळ चित्रपटासाठी पैसे मोजत होते. मात्र, या स्थितीमुळे माधुरीला चांगलाच पश्चाताप झाल्याचे पाहायला मिळते.